Latest

Ananya Panday-Aditya Roy Kapur : अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर रिलेशनशिपमध्ये? दोघांचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवुड अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या डेटिंगच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. शुक्रवारी (दि.२८) रात्री अनन्या आणि आदित्य यांना पापाराझीच्या कॅमेरासमोर आले. ते मुंबईत डिनर डेटसाठी एकत्र दिसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका व्हिडिओमध्ये अनन्या आणि आदित्य काळ्या रंगाच्या मॅचिंग ड्रेसमध्ये मित्रांशी गप्पा मारताना दिसत आहेत. (Ananya Panday-Aditya Roy Kapur)

दरम्यान, अनन्या आणि आदित्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये दोघेही निश्चितमपे डेटिंग करत असल्याचे स्पष्ट होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, अनन्या आदित्यचा हात धरताना दिसली. तिने तिचे डोकेही आदित्यच्या खांद्यावर एखाद्या जोडप्याप्रमाणे ठेवले होते. मित्रांशी संवाद साधताना दोघांच्या चेहऱ्यावर हास्य होते. (Ananya Panday-Aditya Roy Kapur)

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनन्या आणि आदित्य गेल्या काही काळापासून डेटिंग करत असल्याच्या चर्चा आहेत. गेल्या वर्षी कॉफी विथ करण 7 मध्ये अनन्या दिसल्यानंतर हे सर्व सुरू झाले. अनन्या आणि आदित्य एकत्र असू शकतात असे संकेतही करन जोहरने दिले होते. या वर्षाच्या सुरुवातीला अनन्या आणि आदित्यने युरोपमध्ये रोमँटिक गेटवेचा आनंद लुटला होता. (Ananya Panday-Aditya Roy Kapur)

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT