Latest

Anantnag Encounter : अनंतनागमध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक; आणखी एक जवान शहीद; एकूण 4 जवानांचा मृत्यू

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Anantnag Encounter : जम्मू काश्मीरच्या दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या गडूल जंगलात आज सलग तिसऱ्या दिवशीही दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. सैन्य आपल्या जीवाची बाजी लावून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अभियान राबवत आहे. दरम्यान या चकमकीत जखमी झालेल्या आणखी एका जवानाचा मृत्यू झाला आहे. तर आणखी दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चकमकीत आतापर्यंत चार जवान शहीद झाले आहे. आज प्राण गमावलेल्या चौथ्या सैनिकाची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही, असे इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

Anantnag Encounter : ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांवर नजर

अनंतनागमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशीसुद्धा दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरूच आहे. लष्करच्या दोन दहशतवाद्यांना सैन्याने घेरले आहे. क्वाडकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांवर नजर ठेवली जात आहे. पॅरा कमांडोजनीही कारवाईची जबाबदारी स्वीकारली आहे. घनदाट जंगल आणि डोंगराळ भाग यामुळे हे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय ज्या टेकडीवर दहशतवादी लपून बसल्याचा संशय होता तेथे रॉकेट डागण्यात आले. उझैर खानसह लष्कराच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Anantnag Encounter : दहशतवादी उजैरवर 10 लाखांचे बक्षीस आहे

या हल्ल्यात सहभागी असलेला दहशतवादी उझैर खान (28) हा कोकरनागच्या नागम गावचा रहिवासी आहे. 26 जुलै 2022 पासून तो बेपत्ता होता. त्यावेळी तो लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी बनला होता, असे सांगितले जाते. उझैरचा अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग आहे. त्यामुळे त्याला A+ श्रेणीत ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर 10 लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. घटनास्थळी त्याच्यासोबत एक विदेशी दहशतवादीही आहे, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

संबंधित बातम्या

Anantnag Encounter : तीन शहीद जवानांवर अंत्यसंस्कार

कर्नल मनप्रीत सिंग आणि मेजर आशिष धोनचॅक यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी पानिपत येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. उपअधीक्षक हुमायून भट यांच्यावर गुरुवारी त्यांच्या बडगाम येथील निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात आले. चकमकीनंतर भारतीय लष्कराने गुरुवारी मृतदेह श्रीनगरला एअरलिफ्ट केले होते. गुरुवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यात आली.

Anantnag Encounter : मंगळवारी रात्री कारवाई सुरू झाली होती

अधिकाऱ्यांनी सांगितले की, गडोले भागात दहशतवाद्यांविरोधातील कारवाई मंगळवारी संध्याकाळी सुरू झाली होती, मात्र ती रात्री थांबवण्यात आली. दहशतवादी या ठिकाणीच लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरू करण्यात आली होती. आज शुक्रवारी देखील ही चकमक सुरू आहे. तर आज शुक्रवारी चकमकीत जखमी झालेल्या आणखी एका जवानाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या चकमकीत शहीद जवानांची संख्या 4 वर पोहोचली आहे. तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT