Latest

खुनाच्‍या गुन्‍ह्यातील आरोपी, माजी खासदाराच्या मुलीच्या लग्नासाठी २५ क्विंटल मटण, १५ क्विंटल चिकन, १० क्विंटल मासे, ३ लाख रसगुल्ले…

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील खुनाच्‍या गुन्‍ह्यातील आरोपी व माजी खासदार आनंद मोहन याची मुलगी सुरभी आनंद हिचा आज (15 फेब्रुवारी) विवाह आहे. या शाही विवाहाची चर्चा सध्‍या बिहारमध्‍ये रंगली आहे. रिपार्टनुसार, या शाही विवाहात १०० हून अधिक पदार्थ केले जाणार आहेत. यात शाकाहरी आणि मासांहारी दोन्ही पदार्थांचा समावेश आहे. (Anand Mohan )

२५ क्विंटल मटण, १५ क्विंटल चिकन…

माजी खासदार आनंद मोहन यांच्या मुलीच्या लग्नासाठी सुमारे २५ क्विंटल मटण, १५ क्विंटल चिकन आणि १० क्विंटल मासे मागविण्यात आले आहेत.  त्यांच्या कुटुंबातील शुभम आनंद यांनी सांगितले की ,जावई राजहंस सिंग  हे शाकाहार घेतात. त्यांच्यासाठी खास शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.  या लग्नात दहा प्रकारच्या मिठाई बनवण्यात येणार असून, त्यात गुलाब जामुन, रसगुल्ला, रसमलाई, इमरती, मूग डाळ खीर यांचा समावेश आहे.

Anand Mohan : १५ हजारांहून अधिक पाहुणे

या शाही लग्नाचे  व्यवस्थापन करणारे धीरेंद्र सिंह म्हणाले की, आनंद मोहन यांच्या वतीने १५ हजारांहून अधिक लोक सहभागी होतील. या सर्वांसाठी  वेगळी व्यवस्था आहे. त्यांना कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी  अधिक काळजी घेतली जाणार आहे. आनंद मोहन यांच्या कार्यकर्त्यांसाठी ५० क्विंटलपेक्षा जास्त मांसाहार बनवत आहेत. या शाही विवाहाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह अनेक राजकीय व्यक्तींबरोबरच  विविध क्षेत्रातील लोक उपस्थित राहणार आहेत.

मंडप बांधण्यासाठी  १५ दिवस

आनंद मोहन याची मुलगी सुरभी ही पेशाने वकील आहे तर तिचे भावी पती हे रेल्वेमध्ये क्लास वन अधिकारी आहेत. याचा शाही विवाबिहारची राजधानी पटणातील बैरिया येथे होणार आहे. एका खासगी फॉर्ममध्ये हा शाही विवाहसोहळा होणार आहे. या फार्मचे वैशिष्ट्य म्हणजे, या फॉर्ममध्ये एक आयलंड आहे. या आयलंडवर साधारणत: वीस हजार लोक येवू शकतात. या फार्ममध्ये कृत्रिम तलावासह बागही आहे. हा मंडप बांधण्यासाठी तब्बल १५ दिवस लागले आहेत.

Anand Mohan कोण आहे?

 मुलगी सुरभी हिच्या लग्नासाठी माजी खासदार आनंद मोहन हा सध्‍या पॅरोलवर बाहेर आहे. एका खुनाच्या गुन्ह्यात तो सध्‍या  कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्याच्यावर  खून, दरोडा, अपहरण, खंडणी, गुंडगिरी असे डझनभर गुन्हे दाखल आहेत. १९९४ मध्ये गोपालगंजचे तत्कालीन डीएम जी कृष्णय्या यांच्या हत्येप्रकरणी त्‍याला शिक्षा झाली होती. आनंद मोहन सुमारे  १७ वर्षे तुरुंगात आहेत. डीएम हत्येप्रकरणी त्याला  न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. २००८ मध्ये उच्च न्यायालयाने या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर केले. जुलै २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. 

आनंद मोहन यांचे जावई राजहंसह हे भारतीय रेल्‍वेमध्‍ये 'आयआरटीएस' आहेत. ते मुळचे बिहारमधील मुंगेरचे रहिवासी असून ते शेतकरी कुटुंबातील आहेत. आनंद मोहन आणि राजहंस सिंह यांचे कुटुंबीय एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. राजहंस आणि आनंद मोहन यांचा मुलगा चेतन आंनद मित्र आहेत.

राजहंस यांनी  त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दुर्गापूर येथून बी-टेक केले. 2019 मध्ये त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्याला 660 वा क्रमांक मिळाला. त्‍यापूर्वी त्यांनी टाटा समूहात काम केले होते. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ( यूपीएससी ) पास केली. विशेष म्‍हणजे त्‍यांनी या परीक्षेसाठी कोणताही क्‍लास लावला नव्‍हता.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT