Latest

नाद खुळा…’हँड मेड-फॅन मेड’ आईस्‍क्रीमवर आनंद महिंद्रा फिदा..! व्‍हिडीओ पाहिलात का?

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उन्‍हाच्‍या झळा तीव्र होत आहेत. या दिवसात थंडावा देणारा आईस्‍क्रीम खाण्‍याचा मोह आवरणे कठीणच. आईस्क्रीम आवडत नाही, अशी व्यक्ती विरळच! आज मार्केटमध्‍ये विविध फ्‍लेवर्सचे आईस्‍क्रीम उपलब्‍ध आहेत. मात्र सध्या हँड मेड आणि फॅन मेड आईस्‍क्रीमचा एक व्‍हिडीओ सध्‍या सोशल मीडियावर तुफान व्‍हायरल होत आहे. हा व्‍हिडीओ प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्‍यांच्‍या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ( Anand Mahindra Shares Video )

पंख्याच्या मदतीने आईस्क्रीम!

हँड मेड आणि फॅन मेड आईस्‍क्रीमचा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर त्यांच्या हँडलसह शेअर केला आहे. यामध्‍ये एक महिला झटपट आइस्क्रीम तयार करताना दिसत आहे. महिला पंख्याच्या मदतीने आईस्क्रीम बनवताना दिसत आहे. एका मोठ्या स्टीलच्या डब्यात महिला आईस्क्रीमचे मिश्रण कसे तयार करत आहे, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर महिला एका मोठ्या डब्यात हलवते आणि नंतर बर्फाने भरते. यानंतर, महिलेने तो पंख्याला बांधला आणि तो सुरु केला. पंखा कसा हळूहळू फिरतो आणि काही वेळाने आईस्क्रीम तयार होते.  व्हिडिओच्या शेवटी, महिला एका भांड्यात आईस्क्रीम काढते आणि सर्व्ह करते.

Anand Mahindra Shares Video : तुम्ही हे फक्त भारतातच पाहू शकता…

व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, "जेथे इच्छा असते, तेथे मार्ग असतो. हाताने आणि पंख्याच्या मदतीने बनवलेले आईस्क्रीम. तुम्ही हे फक्त भारतातच पाहू शकता."आनंद महिंद्रा यांनी त्‍यांच्‍या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्‍या २ मिनिटे ३१ सेकंदांच्‍या या व्‍हिडिओला आतामध्‍ये 868.6k व्ह्यूज मिळाले आहेत. ४० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला युजर्सचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT