Latest

Nakhrewali Film : आनंद एल राय यांच्या आगामी ‘नखरेवाली’ची घोषणा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : जिओ स्टुडिओ आणि आनंद एल. राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन्स हे नेहमीच त्यांच्या वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्ससाठी ओळखले जाते. लवकरच ते 'नखरेवाली' ( Nakhrewali Film ) हा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या चित्रपटात अभिनेता अंश दुग्गल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

संबंधित बातम्या 

सिनेसृष्टीतील उदयोन्मुख नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कलर यलो प्रॉडक्शनने अंश दुग्गलची या रोमांचक प्रोजेक्टसाठी मुख्य स्टार म्हणून निवड केली आहे. ( Nakhrewali Film ) हा चित्रपट राहुल शांकल्या दिग्दर्शित करणार असून आजपासून त्याच्या चित्रीकरण सुरू होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा करणार आहेत. या चित्रपटातील एका थीमची झलक व्हिडिओमधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.

अभिनेता अंश दुग्गल याने याविषयी उत्साह व्यक्त करताना सांगितले की, "आनंद सर आणि आमचे दिग्दर्शक राहुल शंकल्य यांच्यासोबत माझ्या अभिनयात पदार्पण केल्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. यामुळे माझे खरोखर एक स्वप्न पूर्ण झाले आहे आणि मी खूप आनंदी आहे. या अविश्वसनीय प्रवासाची खूप आतुरतेने वाट पाहत आहे. आज माझ्या आयुष्यातील एका रोमांचक अध्यायाची सुरुवात आहे "

SCROLL FOR NEXT