Latest

मुलुंडमध्ये इमारतीचे छत कोसळून वयोवृध्द दाम्‍पत्‍याचा मृत्‍यू

निलेश पोतदार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुलुंडमध्ये दुसर्‍या मजल्यावर राहणारे जेष्ठ नागरिकांचे जोडपे छतासह खाली कोसळून दोघांचा ही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  मुलुंड च्या नानेपाडा विभागात असलेल्या मोती छाया या दुमजली इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर मध्ये देविशंकर शुक्ला(93) आणि त्यांची पत्नी अरखीबेन शुक्ला(87) रहात होते.सुमारे आठ वाजताच्या दरम्यान त्यांच्या घराची जमीन म्हणजे खालील घराचा चे छत खाली कोसळले. त्या वर रहाणारे शुक्ला दांपत्य ही त्या बरोबर खाली कोसळून गंभीर जखमी झाले.त्यांना जवळील
आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले.मात्र दाखल पूर्वच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर ने जाहीर केले.

ही इमारत खूप जुनी आणि खीळ खिळी झाली होती.मात्र तरी देखील काही कुटुंब यात रहात आहेत.शुक्ला दांपत्य यांच्यासह आणखी तीन कुटुंब ही या ठिकाणी रहातात.इमारत अतिशय जीर्ण असली तरी प्रशासन चा यात हलगर्जीपणा आणि गावठाण बाबत चे प्रश्न या मुळे ही दुर्घटना झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.

  हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT