Latest

इम्रान खान यांना बसणार मोठा झटका, राजकीय पक्षावर येणार बंदी?

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्तान माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजकीय पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) वर बंदी घालण्याचा विचार करत आहे, असे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आज ( दि.२४) स्‍पष्‍ट केले.

माध्‍यमांशी बोलताना आसिफ म्‍हणाले की, इम्रान खान यांचा पक्ष तेहरीक-ए-इन्साफने देशातील व्‍यवस्‍थेवरच हल्‍ला केला आहे. पाकिस्‍तानमध्‍ये असा प्रकार यापूर्वी कधीच घडलेले नाही. हे सहन . ते सहन केले जाऊ शकत नाही".

इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणी ९ मे रोजी अटक करण्‍यात आली होती. या कारवाईनंतर पाकिस्‍तानमध्‍ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. लष्कराच्या इमारतीवर जमावाने हल्‍ले कले होते. तसेच सरकारी कार्यालयाच्‍या इमारती जाळल्या होत्‍या. दरम्‍यान, मंगळवारी ( दि. २३) पाकिस्‍तानमधील दहशतवाविरोधी न्‍यायालयाने (एटीसी) माजी इम्रान खान यांच्या विरोधात नोंदवलेल्या आठ प्रकरणांमध्ये आज अंतरिम जामीन वाढवला आहे.

इम्रान खान यांच्‍या पक्षावर बंदी घालण्‍याचा विचार सरकारने व्‍यक्‍त केल्‍याने आता त्‍यांच्‍या अडचणीत आणखी वाढ होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT