Latest

इम्रान खान यांना मोठा दिलासा, दहशतवादविरोधी न्यायालयाने अंतरिम जामीन वाढवला

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना आज ( दि. २३) दहशतवादविरोधी न्यायालयाने मोठा दिलासा दिला.

पाकिस्‍तानमधील दहशतवादविरोधी न्‍यायालयाने (एटीसी) माजी इम्रान खान यांच्या विरोधात नोंदवलेल्या आठ प्रकरणांमध्ये आज अंतरिम जामीन वाढवला. मागील आठवड्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढत होत्‍या. त्‍यांच्‍या लाहोरमधील जमान पार्क निवासस्थानात ४० दहशतवादी लपल्‍याचा दावा पंजाब सरकारने केला हाेता. त्‍यामुळे इम्रान खान यांना काेणत्‍याही क्षणी अटक केली जाईल, असे मानले जात हाेते.

पाकिस्‍तानचे माहिती मंत्री आमिर मीर यांनी इम्रान खान यांच्यावर आरोप करताना म्हटले होते की, इम्रान खान हे मागील एक वर्षाहून अधिक काळ पाकिर्‍स्ंतान लष्कराला लक्ष्य करत आहेत. इम्रान खानला अटक करण्यापूर्वी पीटीआयच्या सर्वोच्च नेतृत्वाने देशात हिंसाचाराचा कट रचला होता. इम्रानच्या अटकेनंतर 9 मे रोजी लाहोरमधील लष्करी प्रतिष्ठानांवर झालेले हल्ले पूर्वनियोजित होते, असेही ते म्‍हणाले होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT