Latest

Amrit Kalash Yatra : नाशिकच्या कळवणला अमृत कलश यात्रेची मिरवणूक

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाची सुरुवातीला विरोधकांसह अनेकांनी चेष्टा करीत खिल्ली उडविली. मात्र, आज स्वच्छ भारत योजनेअंतर्गत देशात ११ कोटी शौचालये बांधून झाली आहेत. त्यांचा वापरही सुरू आहे. यामुळे कोट्यवधी महिला सुरक्षित झाल्या असल्याचे प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. (Amrit Kalash Yatra)

संबधित बातम्या :

मेरी मिट्टी, मेरा देश अभियानांतर्गत कळवण पंचायत समितीतर्फे अमृत कलश यात्रेची कळवण शहरात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कळवण एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब शिंदे होते. प्रमुख अतिथी म्हणून सहायक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, तहसीलदार रोहिदास वारुळे, गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील उपस्थित होते. डॉ. पवार म्हणाल्या की अनेक मुली, महिलांना शौचासाठी उघड्यावर जावे लागत होते. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस व समाजकंटकांपासून त्यांची सुरक्षा धोक्यात होती. अनुदान देऊन हर घर शौचालय योजना राबविल्याने महिलांना सुरक्षा मिळाली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होऊन आरोग्यही सुधारले आहे. (Amrit Kalash Yatra)

अमृत कलश यात्रा (Amrit Kalash Yatra) कळवण स्थानक परिसरात सुरू होऊन मेनरोड, डॉ. न्यारती चौक ते का. ज. पाटील चौकात नेण्यात आली. या ठिकाणी यात्रेचे सभेत रूपांतर झाले. याठिकाणी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आणलेल्या अमृत कलशाचे पूजन केले. या यात्रेत आरकेएम विद्यालय कळवण, जनता विद्यालय मानूर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी पंचायत समिती ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बचत गटाच्या सदस्यांसह इतर विभागांनी सहभाग नोंदविला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, राजेंद्र ठाकरे, शहराध्यक्ष निंबा पगार, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष एस. के. पगार, गोविंद कोठावदे, विकास देशमुख, हितेंद्र पगार, हेमंत रावले, चेतन निकम, कृष्णकांत कामळस्कर, सचिन सोनवणे, बेबीलाल पालवी, रमेश कुवर आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT