Latest

अमरावती : व्हिडिओ व्हायरलची धमकी देत तरुणीकडे मागितली खंडणी

सोनाली जाधव
अमरावती, पुढारी वृत्तसेवा : मित्रासोबत सेल्फी घेतलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणीला १ हजार ५०० रुपयांची खंडणी मागीतली. ही घटना बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ मार्च रोजी उघडकीस आली. पिडित मुलीच्या तक्रारीवरून संबंधित मोबाईल क्रमांकाच्या धारकाविरुध्द खंडणी व विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, ती वसतिगृहात असताना, तिला एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून संदेश आला होता. त्यावेळी तिने कोण आहे असे संदेश पाठविला. त्यानतंर संबंधित मोबाईल धारकाने तरुणीला मी इंटरशिपकरिता अर्ज केला होता, त्यानंतर तु ग्रुपला अॅड झाली. त्या ग्रुपमधून मोबाईल क्रमांक मिळाल्याचे संबंधित मोबाईल धारकाने तरुणीला सांगितले. त्यानंतर त्याने तरुणीशी ओळख वाढविण्यासाठी संदेश पाठविले, परंतू तरुणीने उत्तर दिले नाही.

मी हॅकर आहे, काही पण करू शकतो

 १ मार्च रोजी दुपारच्या सुमारास तरुणीला संबंधित मोबाईल क्रमांकावरून एक व्हिडिओ प्राप्त झाला. त्यामध्ये ती तरुणी एका मित्रासोबत सेल्फी काढताना दिसत होती. हा प्रकार पाहून तरुणी घाबरली. तिने संबंधित मोबाईल क्रमांकाच्या धारकाला विचारणा केली असता, मी हॅकर आहे, काही पण करू शकतो. असे तरुणीला म्हटले. त्यामुळे ती तरुणी  घाबरली. त्यानंतर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून तरुणीचा पाठलाग सुरुच होता. दरम्यान मला १५०० रुपये दे, नाही तर तुझा व्हिडिओ आईला पाठवितो, अशी धमकी संबंधित मोबाईल क्रमांकाच्या धारकाने तरुणीला दिली. त्यामुळे तरुणीने बडनेरा पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली आहे.
हेही वाचा
SCROLL FOR NEXT