Latest

Amravati News: पैशाचा पाऊस पडेना, भक्तांनी केली मांत्रिकाचीच हत्या

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: तुम्हाला पैशाचा पाऊस पाडून देतो आणि मालामाल करतो; अशी बतावणी करणाऱ्या मांत्रिकाची अमरावती जिल्ह्यात हत्या करण्यात आली. भक्तांकडून पैसे उकडणाऱ्या मांत्रिकाने पैशाचा पाऊस पडलाच नाही. यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणारे भक्त चिडले आणि त्यांनी मांत्रिकाची हत्या केली.अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या शिवणी शेत शिवारात मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेतील ४ आरोपींना चांदुर रेल्वे पोलिसांनी नागपूर (Amravati News) येथून अटक केली आहे.

चांदुर रेल्वे शहरातील मिलिंद नगरात राहणारा रमेश मेश्राम हा अघोरी पूजा करून पैशाचा पाऊस पाडू शकतो असे सांगायचा. मंगळवारी १५ ऑगस्टला सायंकाळी शिवणी येथील एका शिवारात त्याने अघोरी पूजा मांडली होती. त्याच्यासमोर नागपूर येथील बाबुराव मेश्राम (४५), अक्रम याकूब (२३), कमलाकर चरपे (४४), राजेश येसनसुरे (२८) आणि मयूर मडगिलवार (२६) हे पाच जण बसले होते. नागपूरवरून खास पैशांचा पाऊस पाडून घेण्यासाठी आलेल्या या पाचही जणांना अघोरी पूजनानंतर पैशांचा पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, बराच वेळ झाला तरी पाऊस पडला नाही. तेव्हा पाऊस का पडत नाही, असा सवाल त्यांनी मांत्रिकाला केला. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची (Amravati News) झाली.

पैशांचा पाऊस पडत नाही या पूजेसाठी आमच्याकडून उकडलेले पैसे परत कर अशी मागणी पाच जणांनी रमेश मेश्राम याच्याकडे केली. मात्र, मेश्राम याने जादूटोणा करण्याची भीती दाखवली. रमेश मेश्राम याने काही करण्याआधीच आरोपींनी त्याला मारहाण केली. यावेळी हातात आलेले फावडे रमेशच्या डोक्यात मारले. या मारहाणीत रमेश हा रक्तबंबाळ झाला. तो खाली कोसळताच पाच ही जणांनी (Amravati News) घटनास्थळावरून पळ काढला.

मांत्रिक रमेश मेश्राम हा शिवनी येथील शेत शिवारात झोपडीत मृतावस्थेत आढळून आला होता. त्याचा मुलगा उज्वलने चांदुर रेल्वे पोलीस ठाण्यात १५ ऑगस्टच्या रात्री याबाबत तक्रार दिली. चांदुर रेल्वे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावण्यास सुरुवात केली. रमेश मेश्राम हा पैशांचा पाऊस पाडून देतो अशी बतावणी करीत असल्याने त्याला मानणाऱ्या भक्तांची मोठी संख्या होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या संपर्कात असणाऱ्या अनेकांची चौकशी केली. तसेच रमेश मेश्राम यांचा मोबाईल तपासल्यानंतर नागपूर येथील पाचजण त्याला भेटायला आले होते, अशी माहिती समोर आली. स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर गाठून कमलाकर मेश्राम, अक्रम याकूब शहा, राजेश येसनसुरे, मयूर मडगिलवार व कमलाकर चरपे या पाच जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी खुनाची कबुली दिली असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी सांगितले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT