Latest

ब्रेकिंग : चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी; बरगडीला दुखापत

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान अभिनेते अमिताभ बच्चन जखमी झाले असून एक अॅक्शन सीन शूट करत असताना ही घटना घडली. अमिताभ यांना दुखापत झाल्याने संबंधित सिनेमाचे शूटिंगही रद्द करण्यात आले. सध्या बिग बी डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे त्यांना दुखापत झाल्याची माहिती दिली.

हैदराबादमध्ये 'प्रोजेक्ट के'च्या शूटिंगसाठी ते गेले होते. या अॅक्शन चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत. 12 जानेवारी 2024 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील अॅक्शन सीन शूट करताना बिग बी जखमी झाले. त्यांच्या उजव्या बरगडीच्या पिंजऱ्याच्या स्नायूला दुखापत झाली आहे. त्यानंतर शूटीग रद्द करण्यात आले.

"हैदराबादमध्ये प्रोजेक्ट के'च्या अॅक्शन शॉट दरम्यान दुखापत झाली. उजव्या बरगडीचा स्नायू तुटला. यामुळे शूट रद्द केले. हैदराबादमधील एआयजी हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन करण्यात आले. डॉक्टरांनी सध्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे," असे अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT