Latest

Amazon Layoffs : अॅमेझॉनमध्ये पुन्हा एकदा नोकर कपात; नऊ हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : आयटी क्षेत्रातील दिग्गज अॅमेझॉनमध्ये पुन्हा एकदा कपातीची तयारी सुरू झाली आहे. कंपनीकडून सोमवारी सांगण्यात आले की पुढील काही आठवड्यांत आणखी ९००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, AWS, Ads आणि Twitch मधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी सुरु आहे. (Amazon Layoffs)

जानेवारीच्या सुरुवातीला अॅमेझॉनमध्ये कपात सुरू झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. खुद्द कंपनीचे सीईओ अँडी जस्सी यांनी याला दुजोरा दिला होता. ते म्हणाले होते की कपात सुरू होत आहे आणि भारतातील हजारो कर्मचाऱ्यांसह कंपनीतील १८००० हून अधिक कर्मचारी प्रभावित होतील. (Amazon Layoffs)

मेटामध्येही मोठ्या प्रमाणात कपात (Amazon Layoffs)

याआधी, फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी मेटामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कमी करण्याची तयारी करण्यात आली होती. यावेळी कंपनीने १०००० कामगारांना कामावरून काढण्याची योजना आखली आहे. कंपनीनेच याची घोषणा केली आहे. मेटा ने १४ मार्च रोजी घोषणा केली की ते त्यांच्या कंपनीतून अंदाजे १०००० कर्मचारी कमी करू शकतात आणि अंदाजे ५००० कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार होती ती सुद्धा केली जाणार नाही. शिवाय चार महिन्यांपुर्वीच सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांना कंपनीने घरचा रस्ता दाखवला होता.

आतापर्यंत दोन लाखांहून अधिक नोकऱ्या गेल्या

बिघडत चाललेल्या अर्थव्यवस्थेमुळे कॉर्पोरेट अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जात आहेत. यामध्ये गोल्डमन सॅक्स आणि मॉर्गन स्टॅन्ले सारख्या वॉल स्ट्रीट बँकांपासून ते Amazon आणि Microsoft सारख्या मोठ्या टेक फर्मपर्यंतचा समावेश आहे. लेऑफ ट्रॅकिंग साइटनुसार, २०२२ च्या सुरुवातीपासून टेक वर्ल्डने २८०,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्यापैकी यावर्षी सुमारे ४० टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले.


अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT