Latest

७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप पवारांवर; मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप हा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांवर केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक शाखा असलेले अजित पवार बाहेर पडल्याने त्यांच्यावर आरोप करण्याचा प्रश्नच नाही. याउलट, जेव्हा आम्ही आरोप केले तेव्हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनेच त्यांना 'क्लीन चीट' दिली होती. अजित पवार भारतीय जनता पक्षाबरोबर आल्याने विरोधकांच्या पोटात दुखू लागल्याची प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

पुण्यात शनिवारी (दि. 5) 'जीएसटी'वरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर 70 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. तो आरोप नेमका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर, की अजित पवार यांच्यावर होता, याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर ते माध्यमांशी बोलत होते.

वनरक्षक परीक्षेत झालेल्या कॉपी प्रकरणात अटक करण्यात आल्याच्या प्रश्नावर परीक्षांमध्ये होणार्‍या कॉपी प्रकरणात विद्यार्थ्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. परीक्षेबाबत कोणतीही अडचण नसून, पेपरच फुटला नसल्याने परीक्षा रद्द होणार नाही. कोल्हापूर येथील विरोधी पक्षांच्या बैठकीत स्वाभिमानी पक्ष असणार असल्याच्या प्रश्नावर कोणीही आमच्यासोबत नाही. तसेच राजू शेट्टीदेखील आमच्यासोबत नसल्याचे मुनगंटीवार यांनी नमूद केले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT