Latest

OCCRP : पनामा पेपर्सनंतर अदानी, वेदांताला गोत्यात आणणारी पत्रकारांची संस्था नेमकं काय करते?

मोहसीन मुल्ला

Organised Crime and Corruption Reporting Project (OCCRP)या संस्थेने अदानी उद्योग समूह आणि त्यानंतर वेदांता उद्योग समूहावर आरोपांची फैरी झाडली आहे. अदानी उद्योग समूहात चांग चुंग लिंग आणि नासिर अली शाबान अहली यांनी कशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक केली यावर OCCRP या संस्थेने प्रकाश टाकला आहे. अदानी समूहाने हे सर्व आरोप नाकारले आहेत, तर दुसरीकडे OCCRP ही संस्थाही चर्चेत आली आहे. (all you need to know about occrp)

अमेरिकेतील उद्योगपती सोरोस यांच्या निधीवर चालणाऱ्या संस्था आणि परदेशातील माध्यमांचा हिंडेनबर्ग अहवाल जीवंत करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका अदानी समूहाने केली आहे.

OCCRP आहे तरी काय?

Organised Crime and Corruption Reporting Project म्हणजेच आर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट ही शोधपत्रकारिता करणाऱ्या २४ संस्थांची मिळून बनलेली संस्था आहे. युरोप, आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत या संस्थेचे काम सुरू आहे. या संस्थेची स्थापना ड्रिव सुलिवन आणि पॉल राडू यांनी केली. तर संचालक मंडळावर मरिना गोर्बिस, डेव्हिड बोर्डमन, अँड्रेस अॅलेक्झांडरसन, सू गार्डनर, सनिता जेम्सबर्गा, टिफनी रोर्बटस हे आहेत. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या पेगासस हेरगिरी आणि पनामा पेपर्स लिक ही गाजलेली प्रकरणे याच संस्थेने शोधली होती.

OCCRP काय करते?

ही संस्था शोधपत्रकारिता करणाऱ्या जगभरातील पत्रकारांना एकत्र आणणे आणि त्यांच्या बातम्या प्रसिद्ध करणे यासाठी काम करते. भ्रष्टाचार उघडकीस आणणे आणि त्यातून जनतेने सत्ताधाऱ्यांना जाब विचारावा असा या संस्थेचा उद्देश आहे. लोकांचं जीवन, जीविताचा हक्क आणि लोकशाही यांना गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार यांचे भय वाटणार नाही, असे जग साकारणे, हे या संस्थेचे ब्रिद आहे, असे लाईव्ह मिंटच्या बातमीत म्हटले आहे.

आतापर्यंतचे प्रोजेक्ट

ही संस्थेने आतापर्यंत ३९८ भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणणल्याचा दावा केला आहे. त्यातून एकूण ७०२ कारवाया झालेल्या आहेत, आणि १० अब्ज डॉलरचा दंड वसुल करण्यात आलेला आहे. यातून ७०२ अधिकाऱ्यांना राजीनामही द्यावा लागला आहे, तर १०० कॉर्पोरेट कारवाया झालेल्या आहेत.

जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंध

OCCRPला बऱ्याच संस्था आणि संघटना आर्थिक मदत करतात. यात The Bay and Paul Foundations, Dutch Postcode Lottery, European Instrument for Democracy and Human Rights, Ford Foundation अशा संस्थांचा समावेश आहे. अमेरिकेतील उद्योगपती जॉर्ज सोरस यांची ओपन सोसायटीस फाऊंडेशन ही संस्थाही OCCRPला अर्थसहाय करते. हिंडेनबर्ग प्रकरणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका मांडली पाहिजे, असे सोरोस यांनी म्हटले होते.

OCCRP पुरस्कार

२०१७मध्ये OCCRPला पनामा पेपर्स प्रकरण उघडकीस आणल्याबद्दल पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. या संस्थेला संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियनकडून पुरस्कार मिळाले आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT