Latest

Kolhapur Football : कोल्हापुरात उद्यापासून अखिल भारतीय शाहू छत्रपती गोल्ड कप फुटबॉल स्पर्धा

अमृता चौगुले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे (केएसए) (Kolhapur Sports Association) चिफ पेट्रन शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाहू छत्रपती गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचे (All India Shahu Chhatrapati Gold Cup Football Tournament) आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर दि. 3 ते 18 मे या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. स्थानिक वरिष्ठ गटातील 16 संघांसह देशपातळीवरील 4 नामवंत संघांचा सहभाग या स्पर्धेत असणार आहे. यामुळे कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमींना देशपातळीवरील चांगला फुटबॉल पाहण्याची संधी उपलब्ध होणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे (एआयएफएफ) (All India Football Federation) कार्यकारिणी सदस्य मालोजीराजे यांनी पत्रकार परिषदेत केले. (Kolhapur Football)

बाद आणि साखळी पद्धतीची स्पर्धा (Kolhapur Football)

स्पर्धा बाद (नॉकॉऊट) व साखळी (लीग) स्वरूपाची असणार आहे. पहिल्या टप्प्यात दि.3 ते 10 मे या कालावधीत स्थानिक वरिष्ठ गटातील 16 संघांदरम्यान बाद पद्धतीचे सामने होतील. यातून 4 संघ पुढील फेरीतील मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेची मुख्य फेरी साखळी पद्धतीने (लीग) दि. 12 ते 18 मे या कालावधीत होणार आहेत. यात मोहामेडन स्पोर्टिंग क्लब कोलकाता, केरळा स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड केरळ, डेंपो स्पोर्टस् गोवा, रूटस् फुटबॉल क्लब बेंगलोर या चार संघांचा सहभाग असणार आहे.

बक्षिसांचा वर्षाव

स्पर्धेतील विजेत्या संघास फिरता मानाचा शाहू छत्रपती गोल्ड कप व 2 लाख 50 हजार रुपये आणि कायमस्वरूपी चांदीची प्रतिकृती देण्यात येणार आहे. उपविजेता संघास 1 लाख 50 हजार व कायमस्वरूपी चषक देण्यात येईल. याशिवाय वैयक्तिक बक्षिसे आणि स्थानिक संघातील स्पर्धेतून साखळी फेरीत प्रवेश करणार्‍या 4 संघांना प्रोत्साहानपर प्रत्येकी 25 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. (Kolhapur Football)

बैठकीसाठी 900 खुर्च्यांची व्यवस्था

पहिल्या फेरीतील स्थानिक सर्व सामन्यांसाठी तिकीट दर नेहमीप्रमाणे पश्चिमेकडील गॅलरीसाठी 20 रुपये तर पूर्वेकडील गॅलरीसाठी 10 रुपये असेल. मुख्य फेरीतील सामन्यांसाठी दि. 12 मे पासून तिकीट दर पश्चिमेकडील प्रेक्षक गॅलरीमधील 1 ते 14 पर्यंतच्या कक्षात 900 खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक खुर्चीसाठी 100 रुपये दर असणार आहे.

पत्रकार परिषदेस वेस्टर्न इंडिया फुटबॉल असो.च्या अध्यक्षा सौ. मधुरिमाराजे, यशस्वीनीराजे, दीपक शेळके, माणिक मडलिक, प्रा. अमर सासने, राजेंद्र दळवी, नंदकुमार बामणे, संभाजीराव पाटील-मांगोरे, नितीन जाधव, प्रदीप साळोखे, दीपक घोडके आदी उपस्थित होते.

गोल्डकपला 50 वर्षांचा इतिहास

केएसएचे संस्थेचे माजी पेट्रन-इन-चीफ छत्रपती शहाजी महाराज यांनी फुटबॉल खेळाच्या विकासासाठी सन 1975 मध्ये शाहू छत्रपती गोल्ड कप स्पर्धेची सुरुवात केली. यानंतर सन 1988, 1991 व 2005 ला ही स्पर्धा झाली होती. यात देशातील अनेक नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. यात युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई, बँक ऑफ इंडिया मुंबई व राया स्पोर्टस् (गोवा) या संघांनी विजेतेपद पटकाविले होते.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT