Latest

Shambhu : Akshay Kumar महादेवच्या भक्तीत लीन, गाणे ऐकले का?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचे "शंभू" गाणे रिलीज झाले आहे. दिग्गज अभिनेता अक्षय कुमारने स्वतः सुधीर यदुवंशी आणि विक्रम मॉन्ट्रोज यांच्यासोबत हे गाणे गायले आहे. (Shambhu) हे ऊर्जेने भरपूर शिवगीत आहे. आज ५ फेब्रुवारीला "शंभू" गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे टाईम्स म्युझिकवर उपलब्ध आहे.. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्ताच्या एका महिन्यापूर्वी "शंभू"चे प्रकाशन होत आहे. (Shambhu)

संबंधित बातम्या –

अक्षय कुमारने व्यक्त केले की, "शंभू" माझ्या हृदयातील खोल जागेतून आलं आहे जो फक्त जय श्री महाकाल या नावाने धडधडत आहे. प्रदीर्घ काळ मी शिवभक्त आहे पण अलीकडे माझा त्यांच्याशी असलेला संबंध आणि त्यांच्याबद्दलची भक्ती अधिकच घट्ट होत चालली आहे. मला असं वाटतं की तो शक्ती आहे, तो प्रेम आहे, तोच आपल्या सर्वांना आवश्यक असलेली मदत आहे, तो तारणहार आहे, तोच शरणागती आहे ज्याला आपण सर्वजण शरण जाऊ इच्छितो, आणि तोच सर्वांचा अंत सुद्धा आहे. या गाण्याने मी फक्त एक थेंब अर्पण करतो त्या असीम चेतनेला जो शिव आहे! जय श्री महाकाल."

विक्रम मॉन्ट्रोजने हे गाणे कंपोज केले आहे. अभिनव शेखर यांचे लिरिक्स आहेत. 'शंभू'ची एक खासियत अशीदेखील आहे की, या गाण्याला अक्षय कुमारने आवाज दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT