Latest

Akshay Kumar : नितीन देसाई यांच्या निधनानंतर OMG 2 चा ट्रेलर पुढे ढकलला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नितीन देसाई यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. (Akshay Kumar ) नितीन यांनी बुधवारी सकाळी जीवन संपवले. त्यांच्या निधनाच्या बातमीने सिनेजगतात शोककळा पसरली आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या OMG 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीजची तारीख पुढे ढकलली आहे. (Akshay Kumar )

अक्षय कुमारने ट्विट करून नितीन देसाई यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. तो म्हमाला-आज OMG 2 चा ट्रेलर रिलीज करणार नाही. अक्षयने लिहिले- विश्वास बसत नाही, नितीन देसाई यांचे निधन झाले हे जाणून मला दुःख झाले. तो प्रॉडक्शन डिझाईनमध्ये एक दिग्गज होता आणि आमच्या सिनेमा जगाचा एक मोठा भाग होता. त्यांनी माझ्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. हे खूप मोठे नुकसान आहे. आम्ही आज OMG 2 चा ट्रेलर रिलीज करत नाही आहोत. उद्या सकाळी ११ वाजता लॉन्च होईल. ओम शांती.

यादिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

अक्षय कुमारने सांगितले की आता त्याच्या OMG 2 चित्रपटाचा ट्रेलर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शित होणार आहे. अक्षयच्या या निर्णयामुळे चाहतेही खूप खूश आहेत. ओएमजी -२ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टक्कर सनी देओलच्या गदर २ या चित्रपटाशी होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत पंकज त्रिपाठी, यामी गौतम देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

SCROLL FOR NEXT