Latest

Mission Raniganj ची निराशाजनक ओपनिंग, अक्षयच्या चित्रपटांना नापसंती?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज' शुक्रवारी चित्रपटगृहात रिलीज झाला. (Mission Raniganj ) पण, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने निराशाजनक ओपनिंग केले आहे. परिणीती चोप्रा आणि अक्षय यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट रिअल लाईफ स्टोरीवर आधारित आहे. या कहानीत अक्षयचा अभिय तर दमदार दिसत आहे. नेहमीच कसदार भूमिका साकारणाऱ्या अक्षयच्या मिशन रानीगंज बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी होईल, हे पाहणे रंजक ठरेल. Mission Raniganj )

ओएमजी २ ठरला होता हिट

ऑगस्टमध्ये अक्षयची 'OMG २' हिट ठरला होता. पण ऑक्टोबरमध्ये रिलीज झालेल्या अक्षयच्या 'मिशन रानीगंज'ला म्हणावा तसा बॉक्स ऑफिसवर चालत नाहीये. 'मिशन रानीगंज' पहिल्याच दिवशी थंड प्रतिसाद मिळाला आहे. रिपोर्ट्सनुसार. २५०० स्क्रीनवर हा चित्रपट रिलीज झालाय.

पहिल्या दिवसाचे इतके कलेक्शन

रिपोर्टनुसार, मिशन रानीगंजने पहिल्या दिवशी ३.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे बजेट १०० कोटींहून अधिक आहे. बुधवारी चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT