Latest

Sky Force : देशाचा पहिला एअर स्ट्राईक चित्रपट ‘स्काय फोर्स’च्या रिलीज डेटची घोषणा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार वर्षातून एखादा तरी चित्रपट मोठ्या पडद्यावर घेऊन येतोच. रुस्तम, एअरलिफ्ट यासारख्या यशस्वी चित्रपटातू आपण पाहिले आहेच की, (Sky Force) अक्षय कुमारला बॉलिवूडचा खिलाडी का म्हणतात? आता त्याचा स्काय फोर्स चर्चेत आलाय. या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आलीय. (Sky Force )

संबंधित बातम्या-

सिनेमा जगतात सर्वात मोठ्या अभिनेत्यांपैकी एक अक्षय आहे. अलिकडेच त्याचा रिलीज झालेला ओएमजी २ ने बॉक्स ऑफिसवर शानदार प्रदर्शन केलं आहे. तसेच तो मिशन रानीगंज द ग्रेट भारत रेस्क्यू चित्रपटामुळेही चर्चेत आहे. अक्षय जसवंत गिल यांच्या भूमिकेत दिसेल. आता अक्षयने म. गांधी- लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने 'स्काय फोर्स'ची घोषणा केलीय.

अक्षय कुमारने आपल्या ट्विटरवर स्काय फोर्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. अक्षय कुमारने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय- आज गांधी-शास्त्री जयंती दिवशी संपूर्ण देश म्हणत आहे -जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान. यापेक्षा आणखी कोणताही आणि या दिवशी शानदार स्टोरीची घोषणा होऊ शकत नव्हतं. स्काय फोर्स, भारताच्या पहिल्या आणि सर्वाधिक घातक हवाई हल्ल्याची आमची उजेडात न आलेली कहाणी. प्लीज, प्रेम द्या, जय हिंद, जय भारत. जियो स्टुडिओज आणि दिनेश विजान द्वारा प्रस्तुत, स्काय फोर्स २ ऑक्टोबर, २०२४ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT