Latest

Akshardham Mandir : अक्षरधाम मंदिराजवळ ड्रोन जप्त; बांग्लादेशी महिलेची चौकशी

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Akshardham Mandir : दिल्लीतील प्रसिद्ध अक्षरधाम मंदिराजवळ उडणारा एक ड्रोन दिल्ली पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका बांग्लादेशी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत ही महिला बांग्लादेशहून पर्यटक व्हिसावर भारतात आल्याची माहिती मिळत आहे.

देशातील प्रसिद्ध अक्षरधाम मंदिर पूर्व दिल्लीत स्थित आहे. येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सोमवारी या मंदिर परिसराजवळ एक ड्रोन उडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच जवळच्या मंडावली ठाण्याचे पोलिसांची एक तुकडी ड्रोन उडत असल्याच्या ठिकाणी पोहोचली. याठिकाणी तपास केला असता एक बांग्लादेशी महिला हा ड्रोन अवैध रित्या उडवत असल्याचे समोर आले. Akshardham Mandir

या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता तिने आपले नाव मोमो मुस्तफा (वय 33), असे सांगितले. ती ढाकाची रहिवासी असून बांग्लादेशमध्ये आपला फोटोग्राफीचा व्यवसाय असल्याचा दावा तिने केला. तसेच ती मे महिन्यापासून भारतात असून 6 महिन्याच्या पर्यटक वीसावर ती भारतात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी महिलेकडील ड्रोन जप्त केला असून या महिलेची अधिक चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT