Latest

Akash Madhwal : आकाश मधवालवर स्थानिक स्पर्धेत बंदी घातली होती

Shambhuraj Pachindre

मुंबई; वृत्तसंस्था : आयपीएलच्या 16 व्या हंगामात एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाच्या टप्प्यावर आकाश मधवालने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे क्रीडा जगतात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. (Akash Madhwal)

उत्तराखंडच्या रूरकी शहरातून येणार्‍या आकाश मधवालची क्रिकेट ते इंजिनिअर आणि पुन्हा क्रिकेट हा प्रवास खूप रंजक आहे. त्याचा भाऊ आशिष माधवालने आकाशसोबत घडलेला एक किस्सा सांगितला. आशिषने 'इंडिया टूडे'शी बोलताना सांगितले की, 'रोहित भाई खेळाडूंना चांगली संधी देतो. तो खेळाडूंवर विश्वास ठेवतो, त्यांना पाठिंबा देतो. नवीन खेळाडू हा कायम घाबरलेला असतो त्याला संघातील स्थान जाण्याची भीती असते. रोहित ही भीतीच दूर करून टाकतो, आकाश आता चांगली कामगिरी करत आहे.' (Akash Madhwal)

आकाशचा भाऊ आशिष पुढे म्हणाला की, 'इंजिनिअरिंग झाल्यानंतर आकाश काम करत होता. मात्र, लोक त्याच्याकडे प्रत्येक दिवशी यायचे आणि त्याला आज काम करू नकोस, आमच्याकडून खेळ, आम्ही तुला पैसे देतो, असे सांगायचे. त्यानंतर आकाशमध्ये बदल झाला. तो उत्तराखंडच्या संघात निवडल्यानंतर तो एक घातक गोलंदाज झाला.'

आकाश हा आधी टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. मात्र, त्याला स्थानिक स्पर्धांमध्ये बंदीचा सामना करावा लागला होता. आशिषने सांगितले की, 'कोणीही त्याला इथे खेळू देत नव्हते. त्याच्या गोलंदाजीला सर्वजण घाबरत होते. त्यामुळे त्याच्यावर स्थानिक स्पर्धांमध्ये बंदी घातली होती. सगळीकडे भीतीचे वातावरण होते. आकाश रूरकीच्या बाहेर जाऊनच खेळत होता. आशिष म्हणाला की, 'हो आता त्याचे टेनिस बॉलचे दिवस गेले. आता तो खूप खूश आहे. रोहित शर्माने त्याचे 50 टक्के टेन्शन दूर केले आहे. पाहा त्यांचे बाँडिंग कसे आहेत.'

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT