Latest

Ajit Pawar : “लग्‍नातील वाडप्‍याचं काम माझ्याकडे आलंय…” ; अजित पवार असे का म्‍हणाले?

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमदारांना निधी वाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'लग्नाच्या पंगतीला वाडपी आपलाच असला की फायदा होतो' असे म्हणत निधीवाटपात राष्ट्रवादीला झुकतं माप दिल्‍याची उघड कबुली अजित पवारांनी दिली.

"राज्‍याचे अर्थमंत्री पद माझ्याकडे आहे, त्यामुळे तिजाेरीच आपल्याकडे आहे. लग्नात पंगतीला वाढप्या ओळखीचा असला तर जेवण करणाऱ्यांचा फायदा होतो. २८८ लोक पंगतीला बसली आहेत आणि वाडप्याचं काम अजित पवारांकडे आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार असले की झुकतं माप दिलं. हा मनुष्य स्वभाव आहे. याच्यात अतिशयोक्ति नाही," असं अजित पवार यांनी जाहीर सभेत बाेलताना केले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT