Latest

पुणे : अजित पवारांच्या हस्ते २७०० घरांसाठी अर्ज भरण्याचा शुभारंभ

backup backup

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तब्बल २७०० घरांसाठी उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवार (दि.२६) रोजी सायंकाळी ४ वाजता व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे ऑनलाईन अर्ज भरण्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती माने-पाटील यांनी दिली. (Ajit Pawar)

कोरोना संकटात गेल्या दीड -दोन वर्षात राज्यातील तब्बल १५ हजार ४९५ गरिब व सर्वसामान्य कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पुणे म्हाडामुळे साकार झाले आहे. दोन-तीन वर्षांतून एखादी सोडत काढणाऱ्या पुणे म्हाडाने  मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीड वर्षांत तब्बल चार बंपर सोडत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

Ajit Pawar : ४ हजार २२२ घरांसाठी सोडत

पुणे म्हाडाच्यावतीने दोन महिन्यांपूर्वी ४ हजार २२२ घरांसाठी सोडत काढली होती. यासाठी तब्बल ७० हजारपेक्षा अधिक लोकांनी अर्ज केले होते. सध्या या घरांसाठी कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज व अन्य प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी म्हडाच्या वतीने स्वतंत्र शिबिर आयोजित करण्यात आली आहे.

या शिबिरामुळे लोकांची खूपच मदत झाली आहे. माने यांनी पुणे म्हाडाचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्व खाजगी बिल्डरांची बैठक घेऊन कायद्यानुसार म्हाडाला २० टक्के फ्लॅट तातडीने उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे ठणकावून सांगितले.

यासाठी सतत पाठपुरावा केला. यामुळेच केवळ दीड वर्षांत पुण्यासह राज्यातील सर्वसामान्य व गरीब कुटुंबांना पुण्यात प्रसिद्ध बिल्डरांच्या प्रोजेक्टमध्ये परवडणाऱ्या दरामध्ये घरे उपलब्ध झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT