Latest

Ahmednagar News : अहमदनगरमधील नालेगाव परिसरात आढळला मृत अवस्थेतील बिबट्या

सोनाली जाधव

अहमदनगर पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील  नालेगाव परिसरातील गायके मळा येथे पांडुरंग पाठक यांच्या विहिरीत बिबट्या मृत अवस्थेत सापडला आहे. विहिरीत बिबट्या पडलेला असल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन  बिबट्याला बाहेर काढले. मृत बिबट हा नर असून साधारण पाच ते सहा वर्षाचा असावा असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

माहितीनुसार, अहमदनगर शहराच्या जवळील केडगाव येथील अंबिका नगर भागात भरवस्तीत गेल्या आठ दिवसापूर्वी वन विभागाने एक बिबट्या जेरबंद केला होता. शहराच्या मध्यवर्ती भागातच बिबट्यांचे संचार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT