पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेटचा जगज्जेता कोण? यासाठी अंतिम युद्ध रंगणार आहे. युद्धभूमी आहे अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम. सामना दुपारी सुरू होणार असला तरी स्टेडियमबाहेर चाहत्यांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. स्टेडियममध्ये १.२५ लाखांहून अधिक प्रेक्षक पोहोचण्याची अपेक्षा आहे. दरम्यान भारतीय टीम स्टेडियममध्ये दाखल झाली आहे.
अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी अहमदाबादच्या स्टेडियमकडे रवाना झाली आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादला पोहोचला आहे. मुंबईत खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही सचिन उपस्थित होता.
भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दाखल झाली आहे. हे दोन्ही संघ २० वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत. २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा शेवटचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरेल.
हेही वाचा :