Latest

Agra News Viral video | हॉटेलमध्ये पतीचा गर्लफ्रेंडसोबत रोमान्स, पत्नी तिथे पोहचली अन् चप्पलनं धू धू धुलाई…

दीपक दि. भांदिगरे

Agra News Viral video : आग्रा येथील एका हॉटेलात पती-पत्नीमध्ये हायहोल्टेज ड्रामा पहायला मिळाला. येथे पत्नीने नवऱ्याला हॉटेलात त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले. पती त्याच्या गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये होता. तेव्हा तिथे पत्नी पोहोचली. दोघांना एकत्र पाहून पत्नीने नवऱ्याची चप्पलने धुलाई केली. संतप्त झालेल्या पत्नीने नवऱ्याच्या गर्लफ्रेंडलादेखील सोडले नाही. हॉटेलमधील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, हा राडा आग्रा येथील हरी पर्वत भागातील हॉटेलात झाला आहे. एक व्यक्ती त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेलात आला होता. याची कुणकूण त्याच्या पत्नीला लागली. तिने क्षणाचाही विलंब न करता आपल्या भावाला सोबत घेऊन तिने हॉटेलमध्ये धडक दिली. तिथे दोघांना एकत्र पाहून तिने जोरदार हंगामा केला. पत्नीने नवरा आणि त्याच्या गर्लफ्रेंडला चप्पलने मारहाण केली. पत्नीचे रौद्र रुप पाहून पतीला मार खाण्याशिवाय पर्याय उरला नाही. हॉटेलमध्ये बराचवेळा हा हायहोल्टेज ड्रामा सुरु होता.

सदर महिलेचा पती एका नर्सिंग होममध्ये काम करतो. दोघांना १६ वर्षाची मुलगी आहे. नवऱ्याचा बाहेरख्यालीपणाला कंटाळ‍ून पत्नी माहेर राहत होती. व्हायरल व्हिडिओत पत्नी चप्पलने पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडची धुलाई करत असल्याचे दिसते. पती माफी मागत होता तरीही पत्नीने चप्पलचा मार थांबवला नाही. घटनास्थळी पोलीसही पोहोचले होते. (Agra News Viral video)

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT