Latest

एजंटांना रेराचे ’कॉम्पिटन्सी सर्टिफिकेट’ हवे ; महारेराचे आदेश

अमृता चौगुले

पुणे : घर खरेदीचे व्यवहार पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी रेराने नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. यापुढे घर खरेदीचे व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी एजंटांना सक्षमता प्रमाणपत्र अर्थात (कॉम्पिटन्सी सर्टिफिकेट) प्राप्त करावे लागणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) नुकतेच आदेश दिले आहेत. बांधकाम क्षेत्र हे सध्या झपाट्याने वाढत आहे. बांधकाम व्यावसायिक फ्लॅट जावेत, यासाठी आकर्षक योजनाही देण्यात येत आहेत. अनेक वेळा रिअल इस्टेट एजंटही खरेदी-विक्री व्यवहार करीत असतात. त्यामुळे आता रिअल इस्टेट एजंटांना रेरा प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. विनापरवाना व्यवहार एजंट करीत असेल, तर त्यांच्यावर यापुढे कारवाई करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

प्लॉट, फ्लॅट विकणार्‍या एजंटांकडे रेराचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यामुळे हे प्रमाणपत्र न घेता एजंट व्यवहार करीत असेल, तर ते कायद्याने चुकीचे असून, याबाबत त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. पुणे आणि ग्रामीण भागात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. तसेच फार्म हाऊस, बंगलो यांचेही खरेदी-विक्री व्यवहार होत आहेत. रेराच्या अंमलबजावणीमध्ये मोठ्या महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. 1 मे 1917 पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

सुरुवातीच्या काळात हा कायदा राबविण्यात काही प्रमाणात अडचणी आल्या होत्या. आता मात्र या कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. रेरामध्ये प्रकल्पाच्या प्राथमिक नोंदीच्या वेळीच हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण केला जाणार आहे, घराचा ताबा कधी दिला जाणार ती तारीख, खरेदीखत कधी करून दिले जाणार ती तारीख, ग्राहकाच्या दृष्टीने आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकल्पात विकसक कोणत्या सोई-सुविधा देणार, त्यांची गुणवत्ता कोणती, त्या बांधकाम साहित्य निर्मितीची कंपनी कोणती इथपर्यंत विस्ताराने व तपशीलवार माहिती इथे नोंदवणे बंधनकारक आहे.

कोणत्याही विकसकाला स्वत:विषयी, स्वत:च्या कंपनीच्या आर्थिक नियोजनाची व प्रकल्पाविषयीची संपूर्ण माहिती सर्वात आधी नोंद करणेबंधनकारक आहे. ज्यामुळे एखादा प्रकल्प पूर्ण करण्याची त्या विकसकात प्रकल्प सक्षमपणे पूर्ण करण्याची क्षमता आहे की नाही, हे ग्राहकाला तपासता येते. महत्त्वाचे म्हणजे प्रकल्पाच्या किंमतीचा अंदाज म्हणजे जागेची किंमत, बांधकामाचा खर्च व इतर खर्च याविषयी माहिती संकेतस्थळावर देणे सक्तीचे आहे.

पुणे जिल्ह्यात 10 हजार 370 एजंटांनी अर्ज केले होते. त्यापैकी 9,946 जणांचे रजिस्टर करण्यात आले आहे. तर 260 एजंटांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्या आहेत. रेरा प्रमाणपत्र काढण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर एजंटांना आपली सर्व माहिती भरून देऊन व्यवसायबाबतीत कागदपत्रे अपलोड करावी लागतात. तसेच याबाबत प्रशिक्षण ही आवश्यक आहे. प्रमाणपत्र बंधनकारक घर विकणारा आणि घर हवे असणारा या दोघांमधील दुवा म्हणून रिअल इस्टेट एजंट काम करीत असतो.
                      – अ‍ॅड. नीलेश बोराटे, अध्यक्ष, रेरा प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT