Latest

Moonlighting : ‘विप्रो-इन्फोसिस नंतर ‘टीसीएस’ने सुद्धा केले ‘मूनलाइटिंग’वर भाष्य, वाचा काय आहे भूमिका

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Moonlighting : सिलिकॉन व्हॅली अर्थात आयटी पार्कमध्ये सध्या एक विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे, तो म्हणजे 'मूनलाइटिंग'. विप्रो, इन्फोसिसनंतर आता 'टीसीएस' (टाट कन्सलटन्सी सर्व्हिसेस) ने देखिल या विषयावर भाष्य केले आहे. टीसीएस म्हणाले की हा पूर्णपणे नैतिकतेचा विषय आहे. तसेच हे कंपनीच्या मूळ मूल्यांविरुद्ध आहे, असे टीसीएसने म्हटले आहे.

Moonlighting : टीसीएसचे मनुष्यबळ विकासचे मुख्य अधिकारी मिलिंद लक्कड यांनी नुकत्याच माध्यमांसोबत साधलेल्या एका संवादात याविषयी कंपनीचे विचार स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की कंपनीने याविषयी कर्मचा-यांसोबत संवाद साधला आहे. अद्याप तरी अशा कोणत्याही कर्मचा-यावर कारवाई करण्यात आलेली नाही.

तर अधिक माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन म्हणाले, की कर्मचा-यांसोबत करार करताना त्यात स्पष्ट उल्लेख केला आहे की ते अन्य संस्थेसोबत कार्य करू शकत नाहीत.

Moonlighting : मूनलाइटिंगचा ठपका ठेवत विप्रोने ऑगस्टमध्ये आपल्या 300 कर्मचा-यांवर एकसोबत कारवाई करून कामावरून कमी केले. त्यानंतर सिलिकॉन व्हॅलीत मूनलाइटिंग या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे. कारवाई करताना विप्रोचे अध्यक्ष म्हणाले की ते मूनलाइटिंग धोरणाच्या पूर्णपणे विरोधात आहेत आणि याला फसवणूक म्हणतात.

विप्रोच्या या कारवाईवर सर्वप्रथम नॅसकॉमच्या माजी अध्यक्षांनी ट्विटरवर मूनलाइटिंग विषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले एक जॉब करत असताना आणखी एक जॉब करणे ही शुद्ध फसवणूक आहे. टेक इंडस्ट्रीत अशी फसवणूक करणारे खूप आहेत. साधी गोष्ट आहे ही पूर्णपणे फसवणूक आहे, असे प्रेमजी यांनी त्यांच्या ट्विटर वर म्हटले आहे.

विप्रोनंतर इन्फोसिसने देखिल कंपनीच्या कर्मचा-यांना मूनलाइटिंग विरोधात मेल पाठवून चेतावणी दिली आहे. जर ते इन्फोसिसमध्ये कार्य करत असताना अन्य कोणत्या कंपनीत कार्यरत असल्याचे समजल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. असे इन्फोसिसने मेलमध्ये म्हटले आहे.

त्यानंतर टीसीएसने आता या विवादित विषयावर भाष्य केले आहे. कंपनीने हा पूर्णपणे नैतिकतेचा विषय आहे. आणि ते मूळ मूल्ये आणि संस्कृतीच्या विरोधात आहे, असे म्हटले आहे.

Moonlighting : मूनलाइटिंग काय आहे?

एका कंपनीत कार्यरत असताना पुन्हा त्याच्या प्रतिस्पर्धी कंपनीत देखिल काम करणे याला कंपनीच्या भाषेत 'मूनलाइटिंग' असे म्हणतात. भारतातील अनेक कंपन्यांनी याला मनाई केली आहे. तर स्विगी सारख्या काही कंपन्या कर्मचा-यांच्या आर्थिक फायद्यासाठी दुसरा जॉब करण्याची परवानगी देतात आणि याचे समर्थन देखिल करतात.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT