Latest

Kapil Sharma Show : क्या बोलती पब्लिक?; ‘द कपिल शर्मा शो’मध्ये एमसी स्टॅनचा रॅपचा तडका

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : एमसी स्टॅन छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस १६' मधून बाहेर पडल्यानंतर खूपच बिझी झाला आहे. एमसी स्टॅनचे अनेक बॅक टू बॅक शो मार्चमध्ये होणार आहेत. परंतु, त्याआधी तो नाईट पार्टी, गेट-टूगेदर पार्टीत स्पॉट होत आहे. याच दरम्यान तो नुकताच छोट्या पडद्यावरील 'द कपिल शर्मा शो' (Kapil Sharma Show) मध्ये पोहोचला असून स्टेजवर धमाकेदार परफॉर्मस सादर केला आहे. सोशल मीडियावर त्याच्या या व्हिडिओला काही तासांतच २८ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

बिग बॉस १६ चे विजेतेपद पटकावल्यानंतर एमसी स्टॅन थेट 'द कपिल शर्मा' (Kapil Sharma Show) शोमध्ये पोहोचला आहे. यावेळी त्याने लाल रंगाच्या शर्ट-पॅन्टसह ८० लाख रूपयांच्या किमतीचे बुट परिधान केले होते. एमसीने या शोमध्ये रॅप सॉंग्स सादर करताना कॉमेडियन कपिल शर्माही थिरकला आहे. हा व्हिडिओ कपिलने स्वतः आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कपिलने लिहिले आहे की, क्या बोलती पब्लिक?, वाइब है कि नहीं?, लव्ह यू ब्रो एमसी स्टॅन.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी त्याच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव करत कॉमेन्टचा पाऊस पाडला आहे. यावर १५ तासांत २८ लाखांहून अधिकांनी लाईक्सचा पाऊस पडला आहे. एका युजर्सने 'झोपडपट्टीतील मुलगा सेलिब्रिटी बनला. मज्जा आली. कपिल भाई विचार करत असतील की त्यांना इतके लाइक्स कसे मिळाले, कॉमेंट पाहून धक्का बसला असेल. तर एवढं माझ्या पाच पोस्टवरही लाईक्स येत का नाहीत? असा त्यांना प्रश्न पडला असेल.', दुसऱ्या एकाने 'फक्त तीन तासात १८ लाख लाईक्स. एमसी स्टॅनमुळे कपिलचा शो या आठवड्यात रेटिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला असेल'. असे म्हटले आहे. याशिवाय हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे.

एमसी स्टॅन बिग बॉस १६ मध्ये आला तेव्हा फार कमी लोक त्याची ओळखत होती. मात्र, त्याच्या महागड्या बूट आणि गळ्यात घातलेले लॉकेट आणि चेनच्या किमतीने तो चर्चेत आला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT