Latest

Lionel Messi Retirement : विश्वविजेता बनताच लियोनेल मेस्सीनं निवृत्तीचा निर्णय बदलला, म्हणाला…

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्जेंटिना तिसर्‍यांदा फिफा वर्ल्डकप (FIFA World Cup 2022 )स्पर्धेत विश्वविजेता झाला. लियोनेल मेस्सीने (Lionel Messi) या वर्ल्डकप स्पर्धेत १२ गोल केले आणि ८ गोल सहाय्य आहे. १९६६ पासूनच्या वर्ल्डकप इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या कामगिरीच्या जोरावर मेस्सीने 'गोल्डन बॉल' जिंकला. २०१४ नंतर २०२२ च्या वर्ल्डकपमध्ये दुसरा 'गोल्डन बॉल' जिंकणारा मेस्सी पहिला खेळाडू आहे. दरम्यान, वर्ल्डकप जिंकल्यानंतर 'गोल्डन बॉल' विजेत्या मेस्सीने फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याबाबतचा आपला निर्णय बदलला आहे. विश्वविजेता म्हणून आपण आणखी काही सामने खेळणार असल्याचे मेस्सीने म्हटले आहे. याआधी मेस्सीने कतारमधील वर्ल्डकप स्पर्धा ही त्याची अखेरची स्पर्धा असेल आणि फायनलचा अखेरचा सामना खेळेने असे जाहीर केले होते. यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. (Lionel Messi Retirement)

"नाही, मी अर्जेंटिना संघातून निवृत्त होणार नाही. मला चॅम्पियन म्हणून खेळणे सुरू ठेवायचे आहे," असे मेस्सीने एका स्पोर्ट्स चॅनेलशी बोलताना म्हटले आहे. फ्रान्सला हरवून २०२२ फिफा विश्वचषक विजेतेपद पटकावल्यानंतर लगेचच मेस्सीने हा निर्णय जाहीर केला आहे. (Lionel Messi Retirement)

तब्बल १४० मिनिटांहून अधिकवेळ रंगलेल्या रोमांचकारी सामन्यात अर्जेटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शुटआऊटवर ४-२ ने पराभव करत तब्बल ३६ वर्षांनंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले. मेस्सीला टक्कर देणाऱ्या एम्बप्पाने या सामन्यात तीन गोल करून फ्रान्सच्या विजयाची आशा पल्लवीत केली होती, पण पेनल्टी शुटआऊटमध्ये त्याचा संघ अपयशी ठरला. दुसरीकडे मेस्सीने अंतिम सामन्यात दोन करून फुटबॉल जगतात इतिहास रचला.

फुटबाल जगातील सगळे पुरस्कार मिळाले; परंतु त्याच्या खजिन्यात वर्ल्डकप नव्हता. लियोनेल मेस्सी ज्या स्वप्नाच्या शोधात इतकी वर्षे अथक परिश्रम करत होता ते अखेर पूर्ण झाले. २०१४ ला वर्ल्डकप विजयाचे भंगलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धारानेच अर्जेंटिनाचा संघ मैदानावर उतरला. लियोनल मेस्सीचा अखेरच्या वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जेंटिनाच्या प्रत्येक खेळाडूने कोणतीच कसर सोडली नाही. फ्रान्सकडून तोडीस तोड खेळ झाला अन् कायलिन एम्बाप्पे एकटा भिडला. १२० मिनिटांच्या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली अन् पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT