पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचा अंतिम सामना साेमवार, २९ मे रोजी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. सीएसकेने हा रोमहर्षक सामना ५ गडी राखून जिंकला आणि पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. विजयानंतर दीपक चहरने हॉटेलमध्ये भांगडा डान्स केला. हा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दीपकसोबत त्याची पत्नीही दिसत आहे. पाचवे विजेतेपद मिळवल्यानंतर सीएसकेचे खेळाडू सेलिब्रेशनमध्ये बुडताना दिसले. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दीपक चहर सीएसकेच्या विजयावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. (Deepak chahar Bhangra)
विजयानंतर दीपक चहर हॉटेलमध्ये पोहोचला आणि सेलिब्रेशन केले, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दीपक चहर भांगडा डान्स करताना दिसत आहे. विजयानंतर, सीएसके खेळाडूंनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत झाले. यादरम्यान दीपकने भांगडा डान्स केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दीपकसोबत त्याची पत्नीही दिसत आहे. (Deepak chahar Bhangra )
फायनल सामन्यात महेंद्रसिंह धोनी खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला होता. ज्या वेळी संघाला आपल्या खेळाची गरज आहे तेव्हाच आपण योगदान देवू शकलो नाही, यामुळे धोनीच्य चेहर्यावर प्रचंड निराशा होती. दोन चेंडू बाकी असताना धोनी डोळे मिटून खूप उदास दिसत होता. मात्र, यानंतर जडेजाने चमत्कार केला. त्याने मोहित शर्माच्या 15व्या षटकात पाचव्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारून विजय मिळवला. यानंतर जडेजा डगआऊटच्या दिशेने धावला. त्यानंतर धोनीने जडेजाला उचलून खांद्यावर घेतले. या दोघांचा हा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा