काठमांडू / अमृतसर; पुढारी ऑनलाईन : कुख्यात खलिस्तानवादी तसेच वारिस पंजाब दे या फुटीरवादी संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंग याला भारत सरकारच्या विनंतीवरून नेपाळने आपल्या सर्व्हिलान्स लिस्टमध्ये (निगराणी यादी) टाकले आहे. (Amritpal Singh)
पंजाब पोलिस गेल्या 11 दिवसांपासून अमृतपालच्या शोधात आहेत. लवकरच त्याला अटक केली जाईल, असा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे. अमृतपाल नेपाळमध्ये असून तेथून तो अन्य देशांत फरार होण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळताच भारताने नेपाळ सरकारला ही बाब कळविली होती. (Amritpal Singh)
अमृतपाल बनावट पासपोर्टच्या मदतीने तिसर्या देशात पळून जाणार नाही असे बघा. त्याला तत्काळ अटक करा, या भारताच्या विनंतीनंतर नेपाळच्या इमिग्रेशन विभागाने अमृतपालला सर्व्हिलान्स लिस्टमध्ये टाकले. नेपाळमधील सर्व विमानतळे व हॉटेल्सना अमृतपालची छायाचित्रे पाठवून सतर्क करण्यात आले आहे.
दुसरीकडे, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात अमृतपाल हा आधीच पंजाब पोलिसांच्या अटकेत असल्याचा दावा एका याचिकेद्वारे करण्यात आला आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान पंजाबचे अॅडव्होकेट जनरल विनोद घई यांनी अमृतपालच्या वकिलांना अमृतपाल पोलिसांच्या कोठडीत असल्याचे पुरावे सादर करण्यास सांगितले. पुढील सुनावणी 11 एप्रिलला होईल.
अधिक वाचा :