पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले कित्येक दिवस अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. प्रसिद्ध सर्च इंजिन कंपनी गुगलने देखील ही कपात केलेली होती. त्यानंतर आता कंपनीने एक मोठे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. Google ने आता रोबोट्सला कामाच्या ठिकाणांहून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण १०० रोबोट कमी केल्यामुळे कर्मचारी कपातीमध्ये आता हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. (Robot In Google)
जगभरातील आर्थिक मंदीचा परिणाम अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांवर होत आहे. यामुळे कंपन्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर याचा फरक पडलेला दिसून येत आहे. गुगल कंपनीने १०० रोबोट कमी करण्याचा घेतलेला हा निर्णय हे याचेच एक उदाहारण आहे. गुगलच्या (Google) कार्यालयात स्वच्छतेसाठी हे रोबोट्स बसवलेले होते. (Robot In Google)
वायर्ड (Wired) या संस्थेच्या एका अहवालानुसार, Google ची मूळ कंपनी, अल्फाबेटने एव्हरीडेज रोबोट (Everyday Robots) हा विभाग बंद केला आहे. हा विभाग Google चे कॅफेटेरिया स्वच्छ करू शकणारे रोबोट्स विकसित आणि प्रशिक्षण देण्यावर काम करत होता. तंत्रज्ञानाचा सध्याच्या युगात मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असताना देखील कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. रोबोट आणि त्यांचे प्रशिक्षक हे कंपनीच्या बजेटवरील मोठा बोझा आहेत असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहेत .
रोबोट हे मशीन लर्निंग तंत्राचा वापर करून सामान्य क्रिया अधिक वेगाने पार पाडत आहेत. यामध्ये हे रोबोट अधिक पारंगत झाल्याचे देखील दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने १२०० कर्मचारी कामावरून कमी केला. आगामी मंदीला अनुसरुन हे निर्णय कंपनी घेत आहे. आता पुन्हा एकदा खर्चात कपात करण्यासाठी कंपनी नियोजन आखत आहे. जे कर्मचारी ऑफिसमध्ये येऊन काम करतात त्यांचा ताण कमी झाल्याने आणखी खर्च कमी होऊ शकतो. यासाठी गुगल वर्क फ्रॉम होम ही संकल्पना राबवणार आहे. त्यामुळे हा नवीन बदल केला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा