Latest

नोटबंदीनंतर कर आकारणीचा पाया रुंदावला! केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

मोहन कारंडे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नोटबंदीनंतर देशातील करसंकलन आणि कर आकारणीचा पाया रुंदावण्यास मदत झाली, असे लिखित उत्तर केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिले आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने यासंदर्भात केलेल्या निरीक्षणांचा दाखला देत केंद्र सरकारने हा दावा केला. ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये करण्यात आलेल्या नोटबंदी अर्थात विमुद्रीकरणामुळे काळा पैशाचा शोध घेण्यास मदत मिळाली तसेच कर आकारणीत लक्षणीय सुधारणा झाल्याने पैसा वैध प्रवाहात आल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.

आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलनात आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या तुलनेत १८ टक्के वाढ झाली. त्या आधीच्या सात आर्थिक वर्षातील ही वाढ सर्वाधिक होती. २०१७-१८ मध्ये वैयक्तिक प्राप्तिकर (पीआयटी) आगावू करसंकलन २३.४ टक्के आणि स्वमूल्यांकन केलेला वैयक्तिक आयकर २०१६-१७ या आर्थिक वर्षापेक्षा २९.२ टक्के वाढला. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये आयकर विभागाकडे आलेल्या आयकर परताव्यांची संख्या आर्थिक वर्ष २०१७-१८ पेक्षा २५ टक्क्यांनी वाढली. हा त्या आधीच्या पाच वर्षातील सर्वोच्च आकडा होता.

नवीन इन्कम टॅक्स परताव्याची संख्या एक कोटी सात लाख झाली. ही संख्या आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ८५.५१ लाख होती. आधीच्या वर्षात नवीन परतावा भरणाऱ्यांची संख्या ५० ते ६६ लाख एवढी होती. कॉर्पोरेट करदात्यांनी भरलेल्या परताव्यांच्या संख्येत १७.२ टक्यांनी वाढ झाली. ही वाढ आर्थिक वर्ष २०१६-१७ मधील ३ टक्के वाढीपेक्षा किंवा आर्थिक वर्ष २०१५-१६ मधील ३.५ टक्के वाढीपेक्षा पाचपटीने जास्त होती, असे उत्तर सरकारने राज्यसभेत दिले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT