Latest

कार्ति चिदंबरम यांच्‍यावर मनी लॉन्‍ड्रिंगप्रकरणी गुन्‍हा दाखल, अटकेची टागंती तलवार कायम

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ति चिदंबरम यांच्‍यावर मनी लॉड्रिंगप्रकरणी आज 'ईडी'ने गुन्‍हा दाखल केला. १७ मे रोजी याप्रकरणीने सीबीआयने कार्ति चिदंबरम यांच्‍या निवासस्‍थानासह कार्यालयावर छापे टाकले होते. आता याप्रकरणी 'ईडी'ने गुन्‍हा दाखल केल्‍यानंतर त्‍यांच्‍यावरील अटकेची तलवार कायम असल्‍याचे मानले जात आहे. 'ईडी' त्‍यांना चौकशीसाठी ताब्‍यात घेण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

एफआयआरमध्‍ये म्‍हटलं आहे की. कार्ति आणि त्‍यांचा निकटवर्ती एस भास्‍कर रमन यांनी वेदांता समूहाच्‍या तलवंडी साबो पॉवर लिमिटेडच्‍या वरिष्‍ठ अधिकार्‍यांना लाच दिली. पंजाबमध्‍ये ही कंपनी एक मोठा प्रोजेक्‍ट करत होती. या व्‍यवहारात मोठ्या प्रमणावर अफरातफरी झाल्‍याचा दावा ईडीच्‍या अधिकार्‍यांनी केली होता.

नेमकं काय आहे प्रकरण?

२०११ मध्‍ये कार्ति चिबंबरम यांचे वडील केंद्रीय गृहमंत्री पी चिंदबरम हे गृहमंत्री होते. यावेळी पंजाबमधील एका चीनी कंपनीतील कर्मचार्‍यांना बेकायदा व्‍हिसा देण्‍यात आला होता. कार्ति यांचे निकटवर्ती भास्‍कर रमन याच्‍या माध्‍यमातून लाच घेण्‍यात आली होती. चीनच्‍या कंपनीच्‍या कर्मचार्‍यांनी भास्‍करच्‍या मदतीने कार्तिला संपर्क केला होता. याप्रकरणी सीबीआयने रमनला अटक केली आहे. सध्‍या तो सीबीआय कोठडीत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT