Latest

Mitali Mayekar : अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा; साडी नेसून मितालीचं ट्रोलर्सना उत्तर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री मिताली मयेकर ( Mitali Mayekar ) कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. गेल्या दोन दिवसापूर्वी मितालीने समुद्रकिनारी हॉट फ्लोरल बिकिनी परिधान केल्याचा फोटो शेअर केला होता. यानंतर लगेच तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली. दरम्यान मितालीचा पती आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने मात्र, तिला विशेष कॉमेंट करत तिचे समर्थन केलं होतं. यानंतर मितालीने पुन्हा एका साडीतील व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

संबधित बातम्या

अभिनेत्री मिताली मयेकरने ( Mitali Mayekar ) तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सुरूवातीला मिताली समुद्राच्या किनाऱ्यावर बिकिनीत ब्लॅक ॲन्ड व्हाईटमध्ये दिसतेय. यानंतर लगेच ब्लॅक रंगाच्या साडीत मराठमोळ्या लूकमध्ये दिसतेय. यावेळी तिने साडीवर मोकळे केस आणि सिव्हलेस ब्लॉऊज परिधान केलं आहे. याशिवाय तिने खांद्यावर पदर घेत आपली संस्कृती जपतानादेखील दिसत आहे. या व्हिडिओला तिने 'Gentle reminder: I haven't and would never forget my roots, no matter what I wear.
अभिमान आहे मला, मी मराठी असल्याचा आणि माझ्या मराठी संस्कृतीचा.??'. अशी कॅप्शन लिहिली आहे. यावरून दोन दिवसापूर्वी परिधान केलेल्या बिकिनीवरून ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर मिळाले आहे.

समुद्रकिनारी बिकिनी परिधान केल्याने तिला 'आपली संस्कृती विसरलीस काय?' यासारखे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी तिला विचारले होते. यानंतर तिने 'मी मराठी असल्याचा आणि मला मराठी संस्कृतीचा अभिमान आहे' म्हटल्याने नेटकऱ्यांची बोलती बंद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह मराठी कलाकारांनी कॉमेन्टस केल्या आहेत. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने 'Ok I love ?' असे म्हटलं आहे. या व्हिडिओला आतापर्यत ५० हजारांहून अनेक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT