पुढारी ऑनलाईन : अब्जावधी डॉलर्सची मानवतावादी मदत आणि शेजारच्या आशियाई देशांसोबतचा वाढता व्यापार यामुळे या तिमाहीत अफगाणिस्तानचे चलन जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचले आहे. गरिबीने ग्रासलेल्या देशासाठी हे एक असामान्य स्थान आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सप्टेंबरच्या तिमाहीत अफगाणी हे जगातील सर्वांत चांगली कामगिरी करणारे चलन म्हणून उदयास आले आहे. २६ सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार सध्या अफगाणी चलनाचे मुल्य डॉलरच्या तुलनेत ७८.२५ एवढे आहे. याचाच अर्थ एक डॉलर आणि ७८.२५ अफगाणी यांचे मुल्य समान आहे. (Afghanistan Currency)
संबंधित बातम्या
दोन वर्षांपूर्वी सत्ता काबीज केलेल्या तालिबानने स्वतःला उंचीवर ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यांनी स्थानिक व्यवहारात डॉलर आणि पाकिस्तानी रुपयाच्या वापरावर बंदी घातली आहे. तसेच त्यांनी देशाबाहेरून डॉलर आणण्यावरुन निर्बंध कडक केले आहेत. अफगाणिस्तानमध्ये ऑनलाइन ट्रेडिंग बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना तुरुंगवासाच्या शिक्षेचा फतवा जारी करण्यात आला आहे. चलन नियंत्रण, रोख प्रवाह आणि इतर आर्थिक व्यवहारांमुळे या तिमाहीत अफगाणी चलन सुमारे ९ टक्के वाढण्यास मदत झाली आहे. आकडेवारी अशी दर्शवते की या चलनाने कोलंबियन पेसोच्या ३ टक्के वाढीला मागे टाकले आहे.
अफगाणी चलन या वर्षी सुमारे १४ टक्के वर आहे. कोलंबिया आणि श्रीलंकेच्या चलनांच्या मागे ते जागतिक यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. तरीही, इथे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. इथल्या दोन तृतीयांश कुटुंबांना मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि महागाईचे रुपांतर चलनवाढीत झाले आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. (Afghanistan Currency)
"चलन नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. पण आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे चलनात होणारी वाढ ही अल्पकाकाळाची असेल," असे एका तज्ज्ञाने सांगितले.
हे ही वाचा :