Latest

SIT : आदित्य ठाकरे यांना धमकी दिल्याच्या प्रकरणाचे विधीमंडळात तीव्र पडसाद

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशात विरोधकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. राज्याच्या एका मंत्र्यांनाच धमकी कशी येते, पोलीस दल काय करतंय, असे प्रश्न विचारण्यात आले. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सविस्तर निवेदन दिलं आहे. (SIT)

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, "ज्या भावना सदस्यांनी सभागृहात व्यक्त केल्या आहेत त्या आणि वेगवेगळ्या सदस्यांच्या तक्रारी लक्षात घेतल्या आहेत. विधानसभा सदस्य किंवा एखादा सामान्य नागरिक त्याच्याही आयुष्याची सुरक्षितता तेवढीच महत्त्वाची आहे. या विषयाचा अभ्यास करून राज्यस्तरावर एसआयटीची स्थापना करून त्या माध्यमातून आलेल्या धमक्या, घडलेली घटना आणि भविष्याकाळात त्यासाठी करायची उपाययोजना यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल", असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

एसआयटीच्या स्थापनेवर भाजपचा विरोध

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणी एसआयटीची (SIT) स्थापना केल्याची घोषणा करत असतानाच विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात आला. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्द्यावर आमदारांच्या समितीची स्थापना करण्याची मागणी केली. ही चर्चा पोलीस स्टेशनमध्येही उपस्थित करण्यात आली असती. सदस्याच्या जीविताला धोका असेल, तर ही आपल्यावर जबाबदारी आहे. एसआयटी किंवा पोलीस यावर लक्ष द्यायला तयार नाही. एकनाथ शिंदेंना धमकी आली. इथल्या अनेक सदस्यांना धमकी आली आहे. आमदारांची समिती तयार करा. ज्यांच्यावर तपासाची जबाबदारी आहे, ते २५ फोन केल्यावर एकदा फोन उचलतात. नेमकं काय सुरू आहे?", असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

आदित्य ठाकरे यांनी दिलेली धमकी

८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ च्या सुमारास सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांना आरोपीने व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज केला. त्यामध्ये ठाकरे यांच्यावर त्याने सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आरोप केले. त्यानंतर सलगपणे फोनही केले. पण, ठाकरे यांनी उचलले नाहीत. शेवटी संतापून आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याच्या धमकीचा मेसेज पाठवला.

आदित्य ठाकरे यांना धमकी देणाऱ्याला अटक केली

मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र, मंत्री आदित्‍य ठाकरे यांना धमकी देणार्‍याला आज अटक करण्‍यात आली. मुंबई गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने संशयित आरोपीला बंगळूर येथे अटक केली आहे. ८ डिसेंबर रोजी आदित्‍य ठाकरे यांना जयसिंह राजपूत नावाने फोन आला. या व्‍यक्‍तीने आदित्‍य यांना फोनवरुन धमकी दिली. यावेळी त्‍याने आपण दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा चाहता असल्‍याचेही यावेळी सांगितले होते. आदित्‍य ठाकरे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. यानुसार पोलिसांनी बंगळूरमध्‍ये जावून संशयित आरोपीला अटक केल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

हे वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT