Latest

डरपोक आहात म्हणूनच गुवाहाटीला पळालात; आदित्य ठाकरे यांची बंडखोर आमदारांवर टीका

backup backup

बुलढाणा पुढारी वृत्तसेवा : तुमच्यात हिम्मत असती तर तुम्ही गुवाहाटीला पळून गेला नसता. हिम्मत असेल तर आमदारकीचे राजीनामे देऊन मैदानात उतरा. मी ही राजीनामा देऊन निवडणूक लढतो, असे खुले आव्हान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी (दि. ७) बंडखोर आमदारांना दिले. मेहकर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. या शेतकरी संवाद कार्यक्रमात खा.अरविंद सावंत, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आ.नितीन देशमुख उपस्थित होते.

फुटीर शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय राममूलकर यांच्या होमपीचवर मेहकरात झालेल्या या सभेत शिवसैनिकांची प्रचंड गर्दी केली होती. यावेळी आदित्य ठाकरे खा.जाधव व आ.रायमूलकर यांना उद्देशून म्हणाले, 'तुमचा पराभव अटळ आहे, निवडणूक लढवायची की नाही ते ठरवा'. आम्ही डोळे बंद करुन गद्दारांवर विश्वास ठेवला ही आमची चूक होती. पण लिहून ठेवा १२ खासदार व ४० आमदारांपैकी एक-दोघांशिवाय इतरांना उमेदवारीच मिळणार नाही.

बुलढाण्याचे फुटीर शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना उद्देशून आदित्य ठाकरे म्हणाले, एक आमदार चुन चुनके मारण्याची भाषा करतात. चुन चुनके मारण्याची हिम्मत असती तर त्यांनी छातीवर वार केले असते. पण त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT