Latest

Aditya Singh Rajput Death : ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे टिव्ही स्टार आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : स्प्लिट्सव्हिला फेम टिव्ही स्टार आदित्य सिंह राजपूत याचा वयाच्या ३२ व्या वर्षी मृत्यू झाला. त्याच्या अंधेरीतील घरातील बाथरुममध्ये तो पडलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या मित्राने व वॉचमनने रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी त्याला मृतघोषित केले. ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे हा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. टिव्ही स्टार व कास्टींग डायरेक्टर म्हणून आदित्य सिंह चित्रपट सृष्टीत सुपरिचित होता. त्याच्या मृत्यूमुळे अवघ्या सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. (Aditya Singh Rajput Death)

अभिनेता, मॉडेल आणि कास्टींग डायरेक्टर म्हणून आदित्य सिंह राजपूत ओळखला जात होता. स्प्लिट्सव्हिला ९ या टिव्ही शोमुळे आदित्यला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. यासह एम टीव्हीवरील अँकर म्हणून तो सुप्रसिद्ध होता. आदित्यच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी त्याच्या राहत्या फ्लॅटमध्ये तो मृतावस्थेत आढळला. त्याच्या मित्राला तो बाथरुममध्ये पडलेल्या अवस्थेत आढळला. बिल्डिंगच्या वॉचमनच्या सहाय्याने मित्राने आदित्यला रुग्णालायात दाखल केले. पण, त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (Aditya Singh Rajput Death)

आदित्यचे कुटुंब दिल्लीत वास्तव्यास आहे तर आदित्य अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील लश्करिया हाईटस् या अपार्टमेंटमध्ये अकराव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रहात होता. ओशियारा पोलिसांना याबाबत कळविण्यात आले असून ते पुढील तपास करित आहेत. पोलिसांनी सांगितले की अभिनेत्याच्या मृत्यूमध्ये काही संग्धिता आढळल्याच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT