Latest

चंद्रपूर : २०० युनिट वीज मोफत मिळावी; विधान भवनावर धडकणार बाईक रॅली

अविनाश सुतार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूरकरांना 200 युनिट वीज मोफत द्यावी, या मागणीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपुरातून अधिकार बाईक रॅली आज (दि.२६) काढण्यात आली. आमदार जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई जोरगेवार (अम्मा) यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविला. जवळपास दोन ते अडीच हजार बाईक्स या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. ही भव्य बाईक रॅली नागपूर विधान भवनावर धडकणार आहे.

चंद्रपूर हा वीज उत्पादक जिल्हा आहे. कोळश्यावर आधारीत वीज प्रकल्प येथे आहेत. त्यामुळे चंद्रपूरकरांना प्रदूषणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याच्या मोबदल्यात चंद्रपूरकरांना घरगुती वापरातील २०० युनिट वीज मोफत देण्यात यावी, शेतीसाठी वीज मोफत देण्यात यावी, उद्योग वाढीसाठी उद्योगांना सवलतीच्या दरात वीज देण्यात यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
या अधिकार बाईक रॅलीला चंद्रपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीला गांधी चौक येथून सुरूवात झाली. ही भव्य रॅली नागपूर विधान भवनाच्या दिशेने रवाना झाली. या रॅलीत दोन ते अडीच हजार बाईकसह १०० चारचाकी वाहने सहभागी झाली होती. जवळपास ५ हजार नागरिक या रॅलीत उपस्थित असल्याचा अंदाज आहे. ही रॅली नागपूर विधान भवनावर धडकणार आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT