Latest

Swara Bhasker : राहुल गांधींच्या पदयात्रेत स्वरा भास्कर म्हणाली, ‘सत्तेत द्वेषाचे राजकारण…’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधींनी मुंबईतील मणिभवनपासून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत न्याय संकल्प पदयात्रा काढण्यात आली. या यात्रेची रॅली मुंबईतील शिवाजी पार्कवर मोठ्या संख्येच्या उपस्थितीत पार पडली. या रॅलीत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि आघाडीचे अनेक नेते सहभागी झाले आहेत. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करही ( Swara Bhasker ) सहभागी झाली होती. यावेळी तिने पुन्हा एकादा राजकारणावर आपले प्रकट मत व्यक्त केलं आहे.

संबंधित बातम्या 

काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबईतील मणीभवनात पोहोचल्यानंतर भारत जोडो न्याय पदयात्रा सुरूवात झाली. या पदयात्रेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी वड्रा याही उपस्थित होत्या. याच दरम्यान शिवाजी पार्कवर यात्रेत बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सहभागी झाली. यावेळी तिने आपले पुन्हा एकदा राजकारणातील प्रकट मत व्यक्त केलं आहे.

यावेळी अभिनेत्री स्वरा भास्कर ( Swara Bhasker ) म्हणाली की, 'ज्या हिंदुस्थानात आपण लहानाचे मोठे झालो आहोत, तिथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. परंतु, काही जणाकडून आमच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाल आहे. आज सत्तेत एक विशेष प्रकारचे राजकारण असून ते द्वेषाचे राजकारण आहे. आपल्यात वेगवेगळ्या देवांच्या नावाने द्वेष पसरविले जात आहेत. तर देवाच्या नावाने हत्या करणे हे सर्वात मोठे पाप आहे. राहुल गांधी यांचा हा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे. असेही तिने म्हटलं आहे. या विधानामुळे पुन्हा एकदा स्वरा चर्चेत आली आहे.

सर्वांना एकत्र आणण्याची विचारधारा

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या की, 'भारत जोडो न्याय यात्रेचा काल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने समारोप झाला. यानिमित्ताने आमची विचारधारा सर्वांना एकत्रित आणण्याची आहे, असे म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आज सायंकाळी ५.३० वाजता बैठक होणार असून, त्यात आघाडीचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

SCROLL FOR NEXT