Latest

Actress Rekha : रेखाचे लग्नाबद्दलचे ‘ते’ बोल्ड स्टेटमेंट, ऐकणाऱ्यांनी कानावर ठेवला हात

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाचे अनेक किस्से आजही चर्चिले जातात. एकेकाळी संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी रेखा आजही तितकीच सुंदर आणि सदाबहार आहे. (Actress Rekha ) आजपर्यंत तिने साकारलेल्या भूमिका आणि त्याचे सिने किस्से चर्चेत असतात. त्याचबरोबर तिच्या खासगी जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी फॅन्स नेहमीच उत्सुक असतात. वादग्रस्त वैयक्तिक जीवन आणि रिलेशनशीपमुळेही अभिनेत्री रेखा चर्चेत आली होती. तिचा एक जुना व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. (Actress Rekha )

हा व्हिडिओ मुलाखतीचा असून होस्ट सिमी ग्रेवाल हिने रेखाची मुलाखत घेतली होती. सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रेखाने असे काही उत्तर दिले की, ऐकणाऱ्यांना धक्काच बसला. सिलसिला फेम रेखाने दिलेल्या उत्तरावर सोशल मीडिया युजर्स खूप साऱ्या प्रतिक्रिया देत आहेत.

रेखा नेहमी विवध मुद्द्यांवर स्पष्ट बोलते. काही वर्षांपूर्वी रेखा जेव्हा सिमी ग्रेवालच्या शोमध्ये गेसट म्हणून पोहोचली होती, तिथे तिने आपल्या जीवनाविषयी अनेक रहस्य उघडकीस आणले होते. रेखाने आपल्या दुसऱ्या लग्नाबद्दल असे उत्तर दिले होते, होस्टसहित प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला होता.

सिमी ग्रेवालने विचारलं होतं की, तुम्ही दुसरे लग्न करणार? यावर रेखा म्हणाली होती, तुझा अर्थ आङे की, कुण्या पुरुषाशी? अर्थात स्त्री नाही….यावर रेखा लगेच म्हणाली-का नाही…?

रेखा पुढे म्हणाली की, माझ्या डोक्यात मी स्वत: माझ्याशी, माझ्या प्रोफेशनशी आणि माझ्या लव्ह वन्सशी लग्न केले आहे. मी स्वार्थी माणूस नाही.

शोमध्ये सिमी म्हणाल्या, जर एक महिला सुरक्षित आहे, तर याचा अर्थ असा की, पुरुषाने तिला सुरक्षिततेची भावना दिलीय. परंतु, रेखाने मध्येच सांगितले की, याचा पुरुषाशी काही संबंध नाही. सर्व महिलेवर अवलंबून आहे.

रेखाचे वैयक्तिक जीवन बरेचसे वादग्रस्त ठरले आहे. पण रेखाने हिंदी चित्रपटसृष्टीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. सिलसिला, उमराव जान, खून भरी मांग यासारखे चित्रपट वाखाणण्याजोगे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT