Latest

नरक वाट पाहतोय! अभिनेत्री केतकी चितळे हिची शरद पवारांविषयी वादग्रस्त पोस्ट

अमृता चौगुले

पुणे; पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) ही आपल्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे सतत चर्चेत असते. तिच्या पोस्टमध्ये नेहमी असभ्य भाषा आणि शिव्या पहायला मिळतात. अशा अनेक पोस्टमुळे ती अनेकदा चांगलीच ट्रोलदेखील झाली आहे, तसेच तिला अनेकांची टीकादेखील सहन करावी लागली आहे. आता तिने थेट राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना टार्गेट करत त्यांच्यावर असभ्य आणि अर्वाच्च शब्दांत टीका केली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये एक काव्य लिहित अत्यंत खालच्या शब्दांत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एक कविता पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे तिने सर्वच मर्यादा ओलांडल्याचे पहायला मिळते.

"तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll"

अशा स्वरुपाची शरद पवार यांची अत्यंत खालच्या शब्दांत निंदा करणारी व असभ्य भाषेचा वापर करण्यात आलेली कविता केतकी चितळे हिने पोस्ट केली आहे. सोबत या कविते खाली ॲडव्होकेट नितीन भावे असे ही कविता लिहिणाऱ्याचे नाव लिहिले आहे.

अशा पोस्टनंतर पुन्हा एकादा अभिनेत्री केतकी चितळे नव्या वादात सापडली आहे. या पोस्टनंतर तिच्या पेजवर अनेक कमेंट पडत आहेत. या कमेंटमध्ये अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. तसेच काहींनी तिच्याप्रमाणे अत्यंत खालच्या आणि गलिच्छ शब्दांत टीका केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT