Latest

Janhvi Kapoor : जान्हवीच्या ‘एनटीआर ३०’ चा पहिला लूक आला समोर; ‘या’ दिवशी येणार चित्रपट

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या 'एनटीआर ३०' (NTR30) चित्रपटाविषयी एक मोठे अपडेट समोर आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ( Janhvi Kapoor )  २६ व्या वाढदिवसानिमित्ताने आगामी 'एनटीआर ३०' चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे. यासोबत चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज (दि. ६ मार्च) रोजी २६ वा वाढदिवसा साजरा करत आहे. या वाढदिवसानिमित्ताने तिच्या आगामी 'एनटीआर ३०' चित्रपटातील पहिला लूक चाहत्यांच्या भेटीस आला आहे. या लूकमध्ये जान्हवी गुलाबी रंगाच्या ब्लॉऊजवर साडी परिधान केली आहे. या फोटोला तिने किलर पोझ दिली असून जान्हवी एका दगडावर बसलेली दिसत आहे. हा फोटो जान्हवीने ( Janhvi Kapoor ) स्वत: च्या इन्स्टाग्राम अकांऊटवर शेअर केला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'It is finally happening ?, Can't wait to set sail with my favourite @jrntr ❤️, #NTR30'. असे लिहिले आहे. यासोबत दिग्दर्शक कोरतला शिवा याचा 'एनटीआर ३०' चित्रपट एप्रिल २०२४ मध्ये रिलीज होणार असल्याच्याही घोषणा केली आहे. जान्हवीचा हा लूक चाहत्याच्या पंसतीस उतरला आहे.

सोशल मीडियावर जान्हवीचा फोटो शेअर होताच चाहत्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात खास करून जान्हवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. या फोटोला तीन तासांत साडेपाच लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT