Latest

Mili Teaser : थंडीने थरथर कापताना जान्हवीच्या ‘मिली’च्या टिझर रिलीज

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०१८ मधील 'धडक' चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी आणखी एक धमाकेदार चित्रपट घेवून येत आहे. या चित्रपटाचे नाव 'मिली' असे आहे. नुकतात मिली चित्रपटाचा सोशल मीडियावर टिझर ( Mili Teaser ) रिलीज करण्यात आला आहे. याआधी या चित्रपटातील जान्हवीची एक झलक पाहायला मिळाली होता.

अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या इंन्स्टाग्रामवर आगामी 'मिली'चा धमाकेदार टिझर ( Mili Teaser ) शेअर केला आहे. यात जान्हवी थंडीने कापताना आणि चिकटटेप काढताना दिसतेय. तर यावेळी जान्हनीने लाल रंगाच्या टिशर्ट परिधान केला असून थंडीने तिच्या चेहरा लाल झाल्याचे दिसून येत आहे. यात एक हातातील घड्याळ, फ्रिजमधील दूध यासोबत अनेक बऱ्याच गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. हा टिझर चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

याआधी जान्हवीने 'मिली' चित्रपटाचा पहिला लूक समोर आला होता. यात ती पाठीवर बॅग घेऊन थरथरत कॅमेराकडे पाहताना दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'तिचे आयुष्य एका तासात बदलणार आहे… मिली' असे लिहिली आहे. यावरून जाव्हवी नेमकी काय करत आहे? शिवाय ती कोणत्या तरू संकटात सापडली आहे काय? या साठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

जान्हवीचा हा चित्रपट मथुकुट्टी झेवियर दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरशिवाय सनी कौशल (बॉयफ्रेंड) आणि मनोज पाहवा ( वडिलांच्या) भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. परंतु, चित्रपट ४ नोव्हेंबरला येण्याची शक्यता आहे. मल्याळम 'हेलन' या चित्रपटाचा रिमेक आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT