Latest

Hema Malini Birthday: हेमा मालिनी ७३ वर्षीही फिट, जाणून घ्‍या त्‍यांच्‍या फिटनेसचे रहस्‍य

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हेमा मालिनी बॉलीवूड इंडस्ट्रीच्या सर्वात प्रसिध्द अभिनेत्री आहेत. त्याकाळच्या सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचा अभिनय, जलवा बॉलीवूडमध्ये अद्यापही कायम आहे. आज १६ ऑक्टोबर रोजी हेमा मालिनी (Hema Malini Birthday) यांचा ७३ वा वाढदिवस आहे. या खास औचित्याने थोडक्यात जाणून घेऊया त्यांची संपत्ती आणि कमाईविषयी. त्याचसोबत वयाची सत्तरी गाठलेल्या हेमा यांच्या फिटनेसचं रहस्यदेखील जाणून घेऊया. (Hema Malini Birthday)

अशी होते कमाई

हेमा मालिनी एक अदाकारा असण्याबरोबरचं एक चित्रपट निर्मातीदेखील आहे. याशिवाय त्या एक उत्तम क्‍लासिकल डान्सर देखील आहेत. अभिनयाशिवाय, त्या राजकारणातही सक्रिय आहेत. त्या एका प्रोजेक्‍टसाठी जवळपास ३ ते ४ कोटी रुपये घेतात. त्यांची एकूण संपत्ती ४४० कोटी रुपये आहे.

हेमा मालिनी यांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत १५ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्यांनी शशी कपूर, शम्मी कपूर, संजीव कुमार, देव आनंद, जितेंद्र, अमिताभ बच्चन आणि अन्य प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.

लक्झरी कार कलेक्‍शन

हेमा मालिनी यांच्याकडे अनेक लक्झरी कार कलेक्‍शन आहे. यामध्ये ऑडी क्यू ५, मर्सिडीज-बेंज एम-क्लास आदि कार्सचा समावेश आहे. त्यांनी त्यांच्या ७१ व्या वाढदिवसाला एमजी हेक्टरदेखील खरेदी केली होती.

डेब्‍यू चित्रपटांतून मिळालं यश

हेमा मालिनी यांना प्रेमाने लोक ड्रीम गर्ल नावाने ओळखतात. त्यांनी बॉलीवूडमध्ये चित्रपट "सपनों का सौदागर"मधून डेब्‍यू केलं होतं. त्या डेब्यू चित्रपटांतूनचं लोकप्रिय झाल्या होत्या. यानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. बॉलीवूडमधील त्यांचे करिअर दमदार राहिले होते. त्यांचा चित्रपट सीता और गीता तसेच शोले ब्लॉकबस्टर ठरले.

राजकीय प्रवास

हेमा मालिनी २००४ मध्ये राज्यसभेत खासदार म्हणून निवडल्या गेल्या. त्या भाजपमध्ये गेल्या. मार्च २०१० मध्ये त्यांना भाजपाची महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०१४ मध्ये त्यांना लोकसभा सदस्य म्हणून निवडण्यात आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही त्या विजयी ठरल्या.

शिक्षणासोबत मिळाले चित्रपटांची ऑफर

हेमा मालिनी यांचा जन्म तामिळनाडूतील आहे. तरीही त्यांनी हिंदी चित्रपटाध्ये मोठे नाव कमावले. हेमा मालिनी यांनी इयत्ता १० वीपासूनच चित्रपटांचे ऑफर येऊ लागले होते. ११ वीत असल्यापासून त्यांनी चित्रपटात काम करणं सुरू केलं. १९६१ मध्ये त्यांनी एक तेलुगु चित्रपट 'पांडव वनवासन'मध्ये नर्तकीची भूमिका साकारली होती. १९६८ मध्ये 'सपनों के सौदागार' मधून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात राज कपूर मुख्य भूमिकेत होते. त्यांनी हेमा मालिनी यांना सांगितल होतं की, तू चित्रपट इंटस्ट्रीचा तारा होशील आणि झालंही तसेच.

यानंतर हेमा मालिनीने १९७० मध्ये 'जॉनी मेरा नाम'मध्ये काम केलं. हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील सुपर हिट चित्रपट होता. यानंतर 'सीता- गीता', 'शोले', 'ड्रीमगर्ल', 'सत्ते पे सत्ता' सह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.

'शोले'च्या शूटिंगदरम्यान धर्मेंद्रसोबत जवळीक

हेमा मालिनी-धर्मेंद्र यांचे अनेक किस्से प्रसिध्द आहेत. दोघांच्या प्रेमाचे अनेक किस्से प्रसिध्द आहेत. परंतु, त्यांच्या नात्याने हेमा मालिनी यांचे वडील खुश नव्हते. ते हेमा मालिनी यांच्यासोबत राहयचे, जेणेकरून त्या धर्मेंद्रला भेटू नये. एका विवाहित अभिनेत्यासोबत मुलीचं नाव जोडलं जाऊ नये, यासाठी हेमा यांचे वडील सतर्क राहायचे. हेमा मालिनी यांच्यासोबत शूटिंगच्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबीयातील कोणता ना कोणता तरी सदस्य नेहमी सोबत राहायचा. खूप प्रयत्न केल्यानंतर १९८० मध्ये धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले.

'हे' आहे फिटनेसचं रहस्य

वयाच्या ७३ व्या वर्षीही हेमा यांचं फिटनेस अवाक करणारा आहे. कोमट पाणी, मध आणि लिंबूसोबत त्यांची दिवसाची सुरुवात होते. हे पाणी त्या दिवसभरात दोनवेळा पितात. हेमा मालिनी शाकाहारी आहेत. मटण, मासे खात नाहीत. हेच त्यांच्या फिटनेसचे मूलमंत्र आहे. त्या शाकाहार घेतात, त्यामुळे वजन नियंत्रित राहतं.

हेमा यांनी एकदा आपल्या फिटनेसचं रहस्य सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की, मागील अनेक वर्षे त्यांनी साखरेचे पदार्थ सोडलेले आहेत. त्याऐवजी त्या मधाचा वापर करतात.

SCROLL FOR NEXT