पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत एकापेक्षा एक दिग्गज कलाकरांनी अभिनयाची छाप पाडली आहे. मालिकेत जयदीप आणि गौरीच्या जोडीन सर्वांची मने जिंकली. जयदीप म्हणजे, मंदार जाधव आणि गौरी म्हणजे, गिरीजा प्रभू यांनी उत्तमरित्या भूमिका साकारली आहे. अभिनयासोबत गिरीजा ( Girija Prabhu ) सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या गिरिजाचा आणखी एकदा मराठमोळा लूक समोर आला आहे.
अभिनेत्री गिरीजा प्रभूने ( Girija Prabhu ) नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक मराठमोळा पारंपरिक लूकमधील व्हिडिओ शेअर केला आहे. यात गिरीजा नांरगी रंगाच्या सहावारी पैठणी साडीसोबत ब्ल्यू रंगाच्या ब्लॉऊजमध्ये खुलून दिसतेय. मोकळ्या कुरळ्या केसांची स्टाईल, हातात बांगड्या, बोटांत अंगठ्या, नाकात मोठी नथ, गळ्यात साजेशीर मोठा नेकलेस, कपाळावर टिकली, मेकअप आणि लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला आहे. या व्हिडिओला तिने 'No one can ever say no to the magic of a saree.?'. असे लिहिले आहे.
यात गिरिजाचे लाजणे, हासणे, मुरडणे आणि निखळ सौदर्यांची जादू पाहायला मिळाली आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला गाण्याचे बोल वाजत आहेत. या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंटसचा पाऊस पाडला आहे. 'Param sundri ❤️', 'So beautiful ??', 'God mulagi kuthey ??', 'Yaaa?', 'Gorgeous ?', 'Nice look gauri dee??', 'So pretty ❤️❤️', 'So nice look', 'Cute ?', 'Great shoot'. यासारख्या कॉमेेंट्स केल्या आहेत. चाहत्यांसोबत अभिनेत्री रश्मी शिंदेनेही गिरिजाच्या फोटोचे भरभरून कौतुक केलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास अडीच हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.
हेही वाचा :