Latest

Esha Gupta : ईशा गुप्ताला राजकारणात जाण्याची इच्छा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : महिला आरक्षण विधेयकांवरून देशभरात चर्चा सुरू आहे. 'नारी शक्ती वंदन अधिनियम' असे या विधेयकाला नाव देण्यात आले आहे. विधेयक सादर झाल्यानंतर अभिनेत्री ईशा गुप्तानेही ( Esha Gupta ) प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला हा निर्णय खूपच कौतुकास्पद आहे. हा एक प्रागैतिक विचार आहे. मी राजकारणात येण्यास इच्छुक आहे.

यापूर्वीही मोदी सरकारने 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' यासारख्या अनेक उपक्रमांतून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न केला आहे. या विधेयकामुळे महिलांना समान अधिकार प्राप्त होतील. महिलाच महिलांचा त्रास समजू शकतात. घरातील लक्ष्मी खूश असते त्यावेळीच ते घर आनंदात असते आणि पंतप्रधान मोदी यांनी तेच केले आहे. लोक ज्या गोष्टीचा केवळ विचारच करतात, त्या गोष्टी मोदी यांनी प्रत्यक्षात करून दाखवल्या आहेत. या विधेयकामुळे देशभरातील महिलांना दिलासा मिळाला आहे. असेही ईशाने ( Esha Gupta ) यावेळी म्हटलं आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT